संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 16 मार्च:- अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीला घेऊन राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेत्तर यासह अन्य विभागांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आज (दि. १५) पंचायत समिती चौक राजुरा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅली काढून घोषणा देत तहसील कार्यालयाच्या मैदाना पर्यंत जुन्या पेंशन सुरू करण्यासंबंधी सरकारचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही माल्यार्पण करून “एकच मिशन, जुनी पेन्शन” यासारखे अनेक घोषणानी देत शहर दुमदुमले.
या रॅलीत शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.तहसील कार्यालयाच्या आवारात विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले व शासनाचा निषेध केला.
दिनांक 14 मार्च पासून राज्यात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशीही तालुक्यातील सरकारी-निमसरकारी, आरोग्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, तहसील, पंचायत समिती, वनविभाग सह अन्य विभागाचे शेकडो कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपात सहभागी झाले. राज्यव्यापी संपाने शासकीय कार्यालयांत शुकशुकाट आहे.यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शिक्षकही मोठ्या प्रमाणावर संपात सहभागी असल्यामुळे शाळा ओसाड पडलेल्या आहेत.जुन्या पेन्शनसाठी मोर्चा निदर्शन आणि ठिय्या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले जात आहे. रॅलीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष संदिप कोंडेकर, प्रदिप पायघन, किरण लांडे, हंसराज शेंडे, आरोग्य विभाग संघटनेचे पि आए कामडी, सुरेश खाडे, महसूल विभागाचे कु. रंजीता कोहपरे, वनविभागाचे संतोष कुकडे, अमोल बदखल, पंकज गावडे, राजु डाहुले, सुधिर झाडे, दिपक भोपळे, श्रीकांत भोयर, बादल बेले यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…