अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सावनेर येथील नगर परिषद कार्यालयातील कर व प्रशासकीय अधिकारी प्रभारी नगररचना सहाय्यक सह एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येऊन तक्रार नोंद केली की तक्रारदार यांचे पत्नीच्या मालकीचा प्लॉट चे गुंठेवारी काढण्यासाठी तक्रारदाराने पत्नीच्या नावाने अर्ज केला असता श्री. सचिन विठ्ठलराव पडलवार वय 31 वर्ष पद कर व प्रशासकीय अधिकारी प्रभारी नगर रचना सहाय्यक नगरपरिषद सावनेर कार्यालय, यांनी तक्रारदारास गुंठेवारी देण्याच्या मोबदल्यात 20000/- रुपये लाचेची मागणी करून श्री.शेखर गोविंदरावजी धांडोळे पद संगणक ऑपरेटर ( कंत्राटी) नगर परिषद सावनेर कार्यालय यांच्या हस्ते 20000/- रुपये स्वीकारतांना नगरपरिषद सावनेर कार्यालय येथे रंगेहात पकडण्यात आले.
नमूद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाच्या दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायदा करिता लाच रकमेची मागणी करून 13 मार्चला स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर जिल्हा नागपूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत असून उपरोक्त आलोसे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई श्री.राहुल माकणीकर – पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, श्री. मधुकर गीते अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, पोलीस निरीक्षक श्रीमती प्रीती शेंडे, पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, नापोशी सारंग बालपांडे, मनापोशी गीता चौधरी, करुणा सहारे, अस्मिता मेश्राम, आशु श्रीरामे, दिपाली भगत, थानापोशी अमोल भक्ते यांनी केलेली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…