✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात प्रथम खरेदी ची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपुर येथे आज आधारभूत किंमत मध्ये शासकीय खरेदी चे शुभारंभ हिंगणघाट बाजार समितीचे सभापती, मुंबई बाजार समितीचे संचालक एड. सुधीरबाबू कोठारी यांच्या शुभ हस्ते झाले.अध्यक्ष स्थानी बाजार समितीचे सभापती हिम्मतभाऊ चतुर होते. उपाध्यक्ष मनीष निखाडे, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. योगिता तुळणकर, खरीदी विक्रीचे उपाध्यक्ष सुरेंद्र कुकेकर, बाजार समिती संचालक महेश झोटिंग,वउल्हास कोटमकर, जिवन गुरुनुले, गणेश वैरागडे, महादेव (पिंटू) बादले, जनार्धन हुलके, समुद्रपूर खरीदी विक्रीचे संचालक शांतीलाल गांधी,केशव भोले, चांगदेव मुंगल, कवडू मुडे, हरिभाऊ बोबले, नगरपंचायतच्या बांधकाम सभापती जया कोराम, नगरपरीषद सदस्या मायाताई जिवतोडे, प्रदीपभाऊ डगवार, राजूभाऊ कटारे, मेहेरबाबा ग्रामीण पत संस्थेचे उपाध्यक्ष अमोल सायंकार, मोतीराम जिवतोडे, आष सह शेतकरी अरुण महाकाळकर, उमेश वैद्य, रणजित चावरे, मनीष गांधी, सचिन तुळणकर, अमित लाजूरकर, संजय वेले इत्यादी प्रमुख हजर होते.
आधारभूत किंमत मध्ये चना विक्री साठी आज पर्यंत 2174 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. आज आभाळ आणी पावसाचे चिन्ह असल्याने फक्त 15 शेतकऱ्यांना एस.एम.एस पाठविले. सर्व प्रथम आलेल्या कमलाकर शेगोकर, सुजातपूर,निखिल गुळघाने, बोथुडा, मयूर हिवंज, चिंचोली या तीन शेतकऱ्यांचे सहकार महर्षी ॳड. सुधीरबाबू कोठारी, सभापती हिम्मतभाऊ चतुर,सुरेंद्र कुकेकर, योगिता तुळणकर आणि पाहुण्याचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले.महाराष्ट्र शासनाने एका शेतकऱ्याकडून एका वेळेस फक्त 13. 5 क्विंटल चना घेण्याचे आदेश आहे ,ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मतभाऊ चतुर यांनी अँड सुधिरबाबु कोठारी यांचे कडे केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये चन्याला 3800 ₹ ते 4515 इतके भाव असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त चना आधारभूत किंमत 5 हजार 335 रु.प्रमाणे विकावे. शेतकऱ्यांनी आपला धान्य व कापूस माल बाजार समिती अंतर्गत परवानाधारक अडतेच्या माध्यमातूनच विकावा असे आव्हान सहकार महर्षी एड. सुधीर बाबू कोठारी ने केले.
कार्यक्रमाचे संचालन सचिव शंकर धोटे यांनी केले तर आभार उल्हासजी कोटमकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता लक्ष्मण वांदिले,राजू काळमेघ,जणार्धन राऊत,शेखर राऊत,व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…