उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- प्रेसिडेंट लॅब चे संस्थापक उद्योगपती व बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांचा जन्मदिन सोहळा कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार व समाज बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धम्ममय वातावरणामध्ये आदरणीय भंते डॉक्टर यश कास्यपायन महाथेरो त्यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने धम्ममय, आनंदी उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
डॉक्टर सुधीर कोलप यांच्या जन्मदिन सोहळ्यासाठी त्यांच्या धम्मपत्नी श्रुती सुधीर कोलप यांनी या सोहळ्याचे आयोजन केले. डॉक्टर कोलप सरांची नात आयुष्यमती श्रीनी अलोक जत्राटकर यांनी सरांचा गुणगौरव पर मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
या मंगलमय जन्मदिन सोहळ्यासाठी बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी धम्म उपासक उपाशीका, अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्टचे आयुष्यमान प्रदीप कांबळे व इतर सर्व धम्म सेवकांच्या वतीने मित्रांगण मासिकांचे जन्मदिनानिमित्त भेट देऊन त्यांचा सन्मान केला. दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगलीचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा सांगलीचे पदाधिकारी बौद्धाचार्य, त्रिरत्न बौद्ध महासंघ सांगली धम्म निनाद शिबिर केंद्र केरेवडी, तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली चे धम्ममित्र धम्म सहाय्यक, सांगली जिल्हा पत्रकार संघटनेचे आदरणीय नवलाई सर, कोलप साहेबांचे कुटुंबीय सर्व नातेवाईक प्राध्यापक मोरे सर व त्यांचे कुटुंबीय प्रेसिडेंट यांचे सर्व सदस्य डॉक्टर सुधीर कोलप यांचे माध्यमिक शाळेपासूनचे सर्व मित्र परिवार धम्म चळवळीमधील सर्व मान्यवर त्यांच्या व्यवसायातील सर्व डॉक्टर मंडळी मित्रपरिवार उद्योगाशी संबंधित मोठा जनसमुदाय याप्रसंगी उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर सुधीर कोलप व यांच्या धम्मपत्नी श्रुती सुधीर कोलप या दोघांनी तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना पुष्प अर्पण करून वंदन केले.
यावेळी आदरणीय भंते यांचे व सर्वांचे स्वागत केले. जितेंद्र कोलप व पारमित धम्मकिर्ती यांनी त्रिशरण पंचशीला ची याचना केली. उपस्थित सर्वांच्या शुभेच्छांच्या वर्षावानंतर डॉक्टर सुधीर कोलप सरांनी सर्वांचे आभार मानले. धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमित धम्मकीर्ती यांनी केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…