प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युज
15 ऑगस्ट आज सर्व देशवासी स्वातंत्र्याचा 75 वा हिरक महोत्सव उत्साहात साजरा करत आहे. पण देश स्वतंत्र झाल्याच्या 75 वर्षानंतर पण आज भारत स्वतंत्र झाला वाचायला अन ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही, देशाला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बलिदान करण्याऱ्या हुमात्मानी पाहलेल्या स्वप्नाची खरच आज फळपूर्ती होत आहे काय??
सर्वत्र युवा तरुण बेरोजगार त्यात हाताला कुठलही काम नाही म्हणून दारूचे अड्डे मटक्याचे अड्डे, गांजा, चरस, बंद पाकिटात चोरून गुटखा आणणारे लोक पाहिले अनेक अवैध धंदे चालवणारे मुलं पाहिले, गरिबी आणि लाचारीमुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुली पाहिल्या, हाताला काम नाही, पिकवलेल्या मालाला भाव नाही म्हणून अनेक तरुण आणि वृद्ध शेतकरी नैराश्यातून आत्महत्त्या केल्याचे पाहिले, बसस्टँड, रेल्वेस्थानक, फुटपाथवर भीक मागणारे अनेक पाच वर्षापेक्षा कमी मुले पाहिले, अंध – अपंग, मेंटल, वेडे, सायको लोक एकवेळच्या अन्नासाठी दर-दर भटकंती करताना पाहिले. आपल्याच पोटच्या पोरीच्या लग्नाला शिक्षणाला पैसा नाही म्हणून स्वतःच्या मुलीला विकणारे मायबाप पाहिले, जाती धर्मावरून एकमेकांचे मुडदे पडणारे तरुण पाहिले, तांड्या वस्तीवर दलित आदिवासी भागात लाईट, पाणी, शिक्षण, आरोग्य यापासून वंचित राहिलेले लाखो लोक पाहिले, अन्नावाचून कुपोषित राहिलेले अनेक चिमुकले मुलं पाहिले, गावात बस नाही म्हणून शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायी चालणारे विद्यार्थी पाहिले, शाळेच्या पाससाठी, हुंडा देण्यासाठी, पैसे नाहीत म्हणून अनेक मुलींनी आत्महत्त्या केल्याच पाहिले. दिवसाढवळ्या पाच वर्षांपासून ते 80 वर्षाच्या म्हातारीपर्यंत मुलींच्या अब्रू लुटताना पहिली, हुंड्यासाठी स्त्रियांचा मानसिक कौटुंबीक छळ करताना तिला जाळून मारताना पाहिले. राजस्थान राज्यात दलीत 9 वर्षाच्या मुलाने शाळेतील मटक्याचे पाणी पिले म्हणून जातीवादी नराधम शिक्षकाने मरत पर्यंत मारल्याचे पाहिले. देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या विधवेला न्यायासाठी दर दर भटकताना पाहिले. गरीब रूग्णाकडून आरोग्य सेवेच्या नावावर पैशाचा भास्म्या रोग जडलेले अनेक डॉक्टर पाहिले. देवाचा आणि धर्माचा चोला घालून अनेक नराधम संत बाबा बापू महिलेवर अत्याचार बलात्कार केल्याचे पहिले. देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी, एसटी, एससी समाजाच्या उच्च शिक्षित होतकरू शेकडो मुलांनी दुर्दैवी आत्महत्या केल्याचे पहिले. देशात असलेल्या लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही पायाखाली तुडवताना पाहिले.
सामाजिक – राजकीय – शैक्षणिक – आर्थिक – आरोग्य क्षेत्रामधील भारताचे जागतिक देशांमधील स्थान भारताचे स्थान एकूण देश
भारताचे स्थान एकूण देश
जागतिक सर्वात जास्त शांततापूर्वक देश 135 163
जागतिक सर्वात जास्त प्रेस स्वातंत्र्य असलेले देश. 142 180
नागरिकांची आर्थिक स्वत्रंतता 121 184
जगातील भ्रष्टाचारी देश 86 180
जगातील सर्वात जास्त आनंदी देश 139 149
जागतिक कुपोषण निर्देशांकात 94 107
सामाजिक प्रगती करणारे देश 117 128
युवा विकास. 122 181
ही आहे आपल्या स्वत्रंत भारत देशाची विकासाची आकडेवारी जे आपल्या विकासाचे धिंडवरे काढत आहे.
स्वतःच्या न्याय, हक्क, स्वातंत्र्य समानतेसाठी आवाज उठवला म्हणून कधी देशद्रोही, तर कधी आतंकवादी, नक्षली म्हणून तुरुंगात आजीवन सडतांना पाहिले, दवाखाण्याचा खर्च भरायला पैसे नाहीत म्हणून दवाखाण्याच्या बाहेर तडफडत तडफडत मेलेल्या लोकांना पाहिलं, पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कोलिमिटरचा प्रवास करून अनेक राज्यात गेलेल्या तरुणांकडून 12/12 तास काम करून घेणारे भांडवलदार पाहिले, कोणी आंबेडकरांचे गाणे वाजवले तर कधीच चौकातून मिरवणूक काढली म्हणून त्याची हत्त्या करणारे लोक पाहिले.
या जीवनात इतक भयावया गोष्टी बघीतल्या, मग मी कसा म्हणू माझा भारत देश महान आहे, स्वतंत्र आहे, मला हे स्वातंत्र्य मान्य नाही म्हणूनच 16 ऑगस्ट 1947 ला लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांनी मोर्चा कडून असे म्हटले की, देश की जनता भुखी है ये आझादी झुठी है.
जय भारत….!
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…