शिवाजीनगर पोलीसांकडून प्राणांतिक अपघाताचा गुन्हा उघड

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ ( 7020794626 )

शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दि. १३/०३/२०२३ रोजी गुग्न ५८/२०२३ भा.द.वि. २७९, ३०४(अ) मह मो.वा.का. कलम १८४, १३४ ११५/१७७ हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयानी कन्टेनर कात्याच्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणार पोलीस भरती करीता आलेल्या महिला उमेदवाराचे वडील नामे- सुरेश सखाराम की वय ५३ वर्ष व्यवसाय रिक्षाचालक, रा. रमाबाई आंबेडकर नगर नाशिक रोड, नाशिक यांना धडक देऊन गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर आरोपी कन्टेनर चालक हा तेथे न थांबता कन्टेनरसह फरारी झाला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी वरिष्ठांकडून सूचना प्राप्त झाल्यावरून श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली दाखल गुन्यातील अज्ञात वाहनाचा आणि वाहनचालकाचा सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे व तपास पथकातील पोलीस अमलदार यानी तेथील घटनास्थळावर व परिसरात सखोल तपास करून पोहवा १०९ रणजित फडतरे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सातत्यपूर्ण तपास करून गुन्हयातील अनोळखी वाहनाची माहिती प्राप्त केली. त्यामध्ये सदरचा कन्टेनर हा बाबा रोडवेज जालना येथील टाटा कंपनीचा कन्टेनर क्र. एमएच २१ / बी. एच/ ३३६९ हा असुन तो कन्टेनर व गुन्हा करणारा चालक हा जालना येथून दि. १६ / ०३ / २०२३ रोजी नगररोडने वाघोली पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदरची माहिती वरिष्ठाना देऊन त्याच्या आदेशाने तपास पथकातील अधिकारी सपोनि भोलेनाथ अहिवळे पहिला १०९ रणजित फडतरेपोहचा. ३८६ अतुल साठे असे खाजगी वाहनाने वाघोली परिसरात रवाना होवून तेथे जाऊन वाघोली वजन काटया जवळ सापळा रचला. दि. १६/०३/२०२३ रोजी ०२/३० वा. चे सुमारास दाखल गुन्हयातील वाहन व त्यावरील चालक वाघोली येथील वजन काटयावर आल्याचा दिसला. त्यास तपास पथकातील अधिकारी सपोनि भोलेनाथ अहिवळे व पोलिस पथक यांनी शिताफीने थांबवून ताब्यात घेतले ताब्यातील वाहनचालकास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अंकुश राजेंद्र राख रा.मु. हाजीपुर पो. ब्रम्हागांव ता. आष्टी जि. बीड असल्याचे सांगितले. तसेच त्याचे ताब्यातील कन्टेनर क्र. एमएच/ २१ / बी. एच / ३३६९ या वाहनाने दि. १३/०३/२०२३ रोजी पहाटे ०४/१५ वा. चे सुमारास शिवाजीनगर पुणे येथील एच पेट्रोल पंप समोर रोड क्रॉस करणा-या इसमास जोरदार धडक देथुन त्याचे मरणास कारणीभूत होवून अपघाताच्या ठिकाणी न थांबताच तसाच भरधाव वेगाने निघुन गेलो अशी कबुली दिली. त्यानंतर त्यास शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे आणुन दाखल गुन्हयामध्ये दि.१६/०२/२०२३० ३/३० वा. अटक करण्यात आली व सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-०१, मा. गजानन टोम्पे, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांच्या आदेशाने शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शना खाली सपोनि भोलेनाथ अहिवळे, पोलिस उप निरिक्षक अर्जुन नाईकवाडे, पोलिस उप निरिक्षक विशाल शिंदे आणि पोलीस अंमलदार रणजित फडतरे, अतुल सावे, बशीर सय्यद, शिवा कांबळे, प्रविण राजपुत, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी यांनी केलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

22 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

22 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

22 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago