रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून,त्यांचेकडुन किं.रू. १७,१२,०२८/- रूचा मुद्देमाल हस्तगत.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवडची कामगिरी

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे:- मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी पोलीस आयुक्तालयाचे हदीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते दिनांक १५/०३/२०२३ रोजी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, अधिकारी व पोलीस अंमलदार असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत रात्रगस्त करीत असताना पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ यांनी दिलेल्या आदेशान्वये चिखली पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे व त्यांचेकडील स्टाफसह चिखली पोलीस ठाणे हद्दीत भंगारची दुकाने चेक करीत असताना एक अॅक्सेस मोपेड व टेम्पो अशी वाहने सरकारी वाहने पाहुन पळून जादु लागली, त्यांना वरील स्टाफचे मदतीने काही अंतरावर जावून आरोपी नामे १) शाकिर शब्बीर अन्सारी, वय-२३ वर्षे रा- लोहिया नगर, एफ पी ५४, गंजपेठ, पुणे २) चाँद गुलाम शेख, वय ४२ वर्षे, रा-५०५३ भवानी पेठ, एडी कॅम्प चौक, पुणे तसेच अॅक्सेस मोपेडवरील ३) नफिज शरिफ अहमद अन्सारी, वय-३४ वर्षे, रा- शिवनेरी नगर, मरियन कॅम्प्लेक्स, फ्लॅट नंबर – २०३, आयडीयल बेकरी जवळ कोंढवा, पुणे यांना शिताफिने पकडले. सदर वाहनांची तपासणी केली असता, टेम्पो क्रमांक एम एच १२ एस एक्स ०८५३ या मध्ये कि. रु. ९,६८,५२८/- रु चा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक/ अपायकारक असा गुटख्याची एकुण २८ मोती मिळुन आली तसेच अॅक्सेस मोपेड गाडी क्रमांक एम एच १४ जी टी ०५०४ या मध्ये ४,४३,५००/- रोख रक्कम मिळुन आली, तसेच सदर गुन्हा करते वेळी वापरलेली २,५०,०००/- रु चा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व कि.रु. ५०,०००/- मारुती सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड असा एकुण मिळुन ५७, १२.०२८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध चिखली पोलीस ठाणे गुरनं १६८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३,१८८ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम ३० ( २ ) ( ९ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री मनोज लोहीया, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री. पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास इंगवले, सहा पोलीस निरीक्षक अंबरीष देशमुख, चिखली पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे, सपोनि नकुल न्यामणे, तसेच पोलीस अंमलदार राहुल खारगे, प्रविण माने, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, प्रशांत सैद, औदुंबर रोगे तसेच चिखली पोलीस ठाणे कडील किसन बडेकर, शिंदे व घनवट यांचे पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

13 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago