पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा पुणे शहर
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची कामगिरी वानवडी पुणे येथे विविध प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या २ आरोपीकडुन एम.डी.एम.ए.गोळया. मॅफड्रॉन एम.डी. एल. एस. डी. पेपर, मशरूम, चरस, हॅश ऑईल, ओझांकुश गांजा, हिरवा गांजा, वजनकाटा दोन मोबाईल संच, रोख रक्कम व अॅक्सीस मोपोड असा एकुण ११,९३,२०० /- रू. कि चा अमली पदार्थ व एवज विरोधी पथक ०२ च्या स्टाफने जप्त केला.
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- अमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तसेच अमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अमलदार हे परिमंडळ-५ मधील पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक १७/०३/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार साहिल शेख व अझीम शेख यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वानवडी येथील एस बैंक येथे दोन इसम त्याची अॅक्सीस मोपेडवर विविध प्रकारचे अमली पदार्थ विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाल्याने सुंदर बातमीवरून अमली पदार्थ विरोधी पथक -२. कडील अधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक, दिगंबर चव्हाण व अमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता २०/१० वा. चानवडी येथील महात्माफुले सांस्कृतीक भवन, एस बैंक येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी दोन इसम लाल रंगाचे अॅक्सेस मोपेड वर बसलेले दिसले त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ५) लायनल लेझली मेस्करेनस वय ३३ वर्षे रा गंगासरा अपार्टमेन्ट ई/२०३ वानवडी, पुणे २) रसलएन्थोनी रेनॉल्ड चंदनशिव वय २१ वर्षे रा गंगासवेरा अपार्टमेन्ट, ई/२०४, वानवडी, पुणे असे सांगीतले असता त्यांची व त्याच्या वाल्यातील अॅक्सीस मोपेडची झडती घेतली. त्यांचे ताब्यात एकूण ११,९३.२००/- रु कि या अमली पदार्थ त्यामध्ये १,०५,०००/- रू कि च्या एम.डी.एम.ए. गोळया ३,२६,०००/- रु कि चे फड्रॉन एम.डी. १,३४,०००/- रु. कि चे एल. एस. डी. पेपर १०,०००/- मशलम ७५,०००/- रु कि चे चरस, ३,९०,०००/- रू कि चे हंश आइल. २१.३००/- रू कि था जोझोकुश गांजा ३०,०००/- रु किया गांजा २०,०००/- रू चे दोन मोबाईल सच ४०,३००/- रु. रोख, ४०,०००/- अॅक्सीस मोपोड व १,०००/- रु किया वजनकाटा असा ऐवज संगनमताने अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जयळ बाळगताना मिळून आल्याने पोलीस अमलदार अझीम शेख यांनी त्या दोघांविरुध्द वानवडी पो.स्टे. येथे गुरजी.नं.१३७/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ( (क), २२(अ) (क), ८ (क), २०(ब) (ii) (अ) (ब).२९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांनी वरील प्रमाणे अमली पदार्थ जप्त केला असुन दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पुणे शहर हे करत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, मुनी, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार साहिल ख अझीम शेख, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, संदिप शेळके, योगेश मांढर, युवराज कांबळे, अझीम शेख, नितीन जगदाळे, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…