सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर तालुक्यातील केम बामणी येथील सिद्धार्थ दीपक कोडापे हा विद्यार्थी इयत्ता दहावी जनता हायस्कूल (डेपो शाखा ) बल्लारपूर येथे सत्र 2022-2023 मध्ये शिकत आहे.
दिनांक 12 मार्च ला रोजी रात्रीच्या सुमारास भागरथी नाल्यावरील पुलावर सिद्धार्थ कोडापे याचे वडील दीपक कोडापे यांचा अपघात झाल्या त्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सिद्धार्थ ला समजताच त्याचा पायाखालची वाळू सरकली. आपल्या पित्याचे छत्र हरपले आहे. त्यात दुसऱ्या दिवशी सिद्धार्थचा दि. 13 मार्च रोजी गणित-1 चा दहावी बोर्डाचा पेपर होता. एककडे वडिलांचा मृत्यूदेह दुसरीकडे जीवनातील महत्वपूर्ण 10 चा पेपर या चिंतेत सिद्धार्थ सापडला होता. अपघात झाल्यानंतर सिद्धार्थच्या वडीलाचा मृत्यदेह दीपक कोडापे यांचे शव शवविच्छेदन गृह बल्लारपूर येथे नेण्यात आले आणि सिद्धार्थ समोर प्रश्न उभा राहिला पेपर द्यायचा का नाही.
त्याच वेळेत वर्गशिक्षक श्री. यु. के. रांगणकर आणि मुख्याध्यापक श्री. बी. बी. भगत यांनी त्याला धीर दिला आणि परीक्षा केंद्रावर येऊन पेपर देण्यासाठी सांगितले. अशा प्रकारे सिद्धार्थ दीपक कोडापे याने वडिलांचे शव शवविच्छेदन गृहात असताना दहावी गणित-1 चा पेपर दिला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…