महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर:- शहरात पंतप्रधान आवास योजनेतील निविदा मध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी शहरातील अनेक ठीकाणी ईडी करून छापेमारी करण्यात आली. मात्र या कारवाई दरम्यान एक वेगळीच घटना समोर आली आहे.
‘इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस’चे रितेश कांकरीया यांच्या उल्कानगरीतील आदित्य नगरातील पसायदान अपार्टमेंटमधील फ्लॅटवर ईडीच्या पथकाने धडक दिली. कंत्राटदाराच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्याची कारवाई सुरू होती. कुणाला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यात कुटुंबातील एक मुलगी दहावीची परीक्षेला गेली होती. त्यामुळे कारवाई सुरु असताना घरातील सदस्यांनी मुलीला परीक्षा केंद्रावरुन आणण्यास जाण्याची परवानगी ईडीच्या पथकाकडे मागितली. पण कुटुंबातील सदस्यांना एकटे न जाऊ देता ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या चुलत्याला सोबत घेत स्वतःच्या गाडीतूनच मुलीला परीक्षा केंद्रावरुन घरी आणले.
रितेश कांकरीया यांची मुलगी ही दहावीछा परीक्षेसाठी गेली होती. पण दुपारी एक वजता तिचा पेपर सुटणार असल्याने रितेश यांच्या भावाने पुतणीला आणण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. तेव्हा पथकातील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या गाडीत रितेश यांच्या भावाला बसवून परीक्षा केंद्रावर घेऊन गेले. तसेच पुन्हा स्वतःच्या गाडीत मुलीला परीक्षा केंद्रावरुन घरी आणले. दरम्यान रुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती.
काय आहे प्रकरण!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्याच्या चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आली होती. या प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यातील काही कंपन्यांनी अटींचे पालन न करता फसवणूक करण्याच्या प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यावर यातील समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सव्र्हिसेस व जगवार ग्लोबल सव्र्हिसेस या तीन कंपन्यांनी एकाच लॅपटॉपवरुन म्हणजे एकाच ‘आयपी’ अॅड्रेसवरुन भरल्याचे समोर आले. त्यामुळे सिटी चौक पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर याच प्रकरणात संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती आणि आता कंत्राटदारांच्या घरी छापेमारी करण्यात येत आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…