बस प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत महिला सन्मान योजना अंमलबजावणीस सुरुवात.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा,दि.18:- राज्य शासनाने नुकतीच महिला सन्मान योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवासामध्ये महिलांना भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत सर्व महिलांना राज्याच्या हद्दीतपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये साधी, मिडी, निमआराम, वातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत) याबसेस मध्ये 50 टक्के सवलत राहील. सदरची सवलत ही भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या बसेसकरीता लागू राहील.
सवलत लागू केलेल्या दिनांकापूर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येणार नाही. सर्व महिलांना भाड्यात 50 टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेद्वारे, विन्डो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल ॲपद्वारे, संगणकीय आरक्षणद्वारे तिकीट घेता येईल. 65 ते 75 या वयोगटातील महिलांना महीला सन्मान योजना हीच सवलत अनुज्ञेय राहील. तसेच 5 ते 12 वयोगटातील मुलींना पुर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत लागू राहील, असे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

47 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

1 hour ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

8 hours ago