प्रशांत जगताप संपादक, 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- वाशिम जिल्हातील मालेगाव, वाशीम, मंगरुळनाथ, कारंजा, मानोरा तालुयातील काही भागांना गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी अवकाळीचा तडाखा बसला. यात बळीराजाच्या शेतातील काढणीला आलेली पिके मातीमोल झाली. त्यामुळे तोंडाजवळ आलेली पिके पाऊसाने गिळून नेली. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा वाशिम जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ मालेगावच्या अध्यक्षा सीमा सुरोशे यांनी केली.
सीमा सूरोशे पुढे बोलताना म्हणाल्या की, वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला. त्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीची नोंद झाली आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हजारो हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा संकटाच्या वेळी शासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. नाही तर जिल्हात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढू शकतात.
पुढे बोलताना सीमा सुरोशे म्हणाल्या की, महसूल कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे पंचनामे कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवून त्यांना मदत करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या इंदिरा इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ मालेगावच्या अध्यक्षा सीमा सुरोशे यांनी केली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…