आजनसरा ते वडनेर सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाची मोजमाप करून चौकशी करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी रस्ते व वाहतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे केली तक्रार.

उकडलेल्या रोडची गिट्टी टाकून रोलरने केली जात आहे दबाई.

🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️

हिंगणघाट:- केंद्रीय निधी कार्यक्रम अंतर्गत सन २०१९-२० सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत २४ कोटी रूपये मंजूर झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असुन त्याचे क्वालिटी कंट्रोल व्दारे मोजमाप करून चौकशी करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी रस्ते व वाहतुक केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदना द्वारे मागणी केली आहे.

रस्ते व वाहतुक केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केंद्रीय निधी अंतर्गत आजनसरा ते वडनेर चौरस्ताहा ०८ कि. मी.च्या रस्त्यावर २४ कोटी रूपये मंजुर केले आहे. हा रस्ता मागील २ वर्षापासुन संभव्यगतीने सुरू आहे. सिमेंटीकरण करण्यासाठी ४ पुल व संपुर्ण रस्ता संपुर्णपणे उखडला असुन एका बाजुला सिमेंटीकरणचे काम सुरू आहे. जुन्या उखडलेल्या रोडवर गिटटी टाकुण रोलरने दबाई चालु असुन त्यावर सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. दोन्ही बाजुने सिमेंटीकरण केलेला रोड कमी दर्जाच्या मटेरियलमुळे फुटला आहे आणि त्या फुटलेल्या रोडवर सिमेंटच्या कॉकीटचे दुसरे कोटींग चढवुन तो रोड दाबल्या जात आहे. त्यामुळे खालच्या कोटींगच्या ड्रायलिंगच्या कामात निकृष्ट दर्जाचे सिमेंट कॉकीट केल्या जात आहे. त्याच प्रमाणे केलेल्या कामावर दोन दोन दिवस पाणी सुध्दा टाकल्या जात नाही. अश्या प्रकारे २४ कोटी रूपये मंजुर असलेल्या कामाचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे.

सिमेंट रस्त्यावर पाणी टाकण्यासाठी काही भागात आळे तर काही भागात पोते टाकले आहे. मात्र त्या आळयात पाणी टाकण्यास दुर्लक्षा होत असुन अल्पावधितच निकृष्ट दर्जाचे लक्षणे दिसु लागले आहे.

आजनसरा हे महाराष्ट्रातील खुप मोठे तिर्थ क्षेत्र असुन भाविक भक्त खुप मोठया संख्येने येतात. भोजाजी महाराज यांचे पावन स्पर्शाने आजनसरा हे गांव पुनीत झाले असुन येथे पुरण पोळीचा नैवैद्य केला जातो.
वडनेर आजनसरा रोडवर मौजा फुकटा अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम चालु आहे. रोडच्या अर्ध्या भागाचे सिमेंट रोडचे काम प्रगती पथावर आहे सिमेंट रोडचे जाळी खाली चुरी व गिटटीचे मिश्रणाचा घर देण्यात आला. सिमेंट रोडचा अर्धा भाग बांधुन झाल्यानंतर १ मिटर रूंद उर्वरीत शोलडरच्या भागाला गिटटी ने भरलेला भाग असतो त्यावर संबंधीत ठेकेदार रोड ड्रेन मधील माती व चुनरवडी सिमेंट रोडचे लेबलने भरत आहे व त्यावर मुरूम टाकुण रोलरने दाबुन रोड लेवल करू असे तेथील कंत्राटदाराचे प्रतिनिधीने सांगितले. वास्तविक या भागात मुरूम भरण्यासाठी कंत्राटदाराचे करारनाम्यात खदानीवरून मुरूम भरण्याचे प्रस्तावीत आहे. परंतु संबंधी कंत्राटदार रोडच्या बाजुला नाली ७ ते ८ फुट खोल करून व शोलडरला माती व त्यावर तिथलाच मुरूम भरत आहे. या रोड साठी उपलब्ध रूंदी मध्ये रोड काम करतांना रोड ड्रेन मधुन मुरूम काढणे व टाकणे धोक्याचे झाले आहे. कारण या मुळे नालीची खोली जास्त होऊन रोडचे भरावाचा उतार २११ असा येत नाही. त्यासाठी
बाहेरून मुरूम आणुन भराव देणे असे करारनाम्यात असतांना चुकीच्या पध्दतीने काम होत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
तसेच शेतक-यांना शेतामध्ये जाण्यासाठी रोडवरून जाणे अत्यंत जीकरीचे झाले असुन शेतक-यांना शेतीची वाहिती करणे अवघड झाले आहे. सदर कंत्राटदाराने शेताच्या कंपाऊडची खांबे व त्यावर असलेला तार सुध्दा तोडुन टाकल्यामुळे शेतक-यांचे बरेच नुकसान झालेले आहे.

तरी आजनसरा ते वडनेर (चौरस्ता) या कामाचे निष्कृट दर्जाचे सुरू असलेल्या कामाची क्वालीटी कंट्रोल विभागाव्दारे केंद्र सरकारच्या अधिका-याकडुन सर्वकश चौकशी करून उत्तम दर्जाचे काम करून दिलास दयावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या वतीने रस्ते व वाहतुक केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांना केली आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago