महाराष्ट्रभरात गाईना इंजेक्शन देऊन त्यांना बेशुध्द करुन त्यांची कत्तल करुन घेवून जाणारे संघटीत गुन्हेगारी टोळी जेरबंद करुन त्यांचेवर मोकका कायदयान्वये कारवाई केलेबाबत..

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

दिघी पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पिंपरी चिंचवड :– पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामिण व रायगड पोलीस अधिक्षक यांचे कार्यक्षेत्रामध्ये रात्रीचे वेळी गाईना गुंगीकारक इंजेक्शन देऊन त्यांना बेशुध्द करुन त्यांची कत्तल करुन घेवून जाणारे टोळीतील ९ आरोपींना दिघी पोलीस ठाणे तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे व त्यांचेकडून एकूण २५,२०,९८०/- रुपये किं.चा मुद्देमाल हस्तगत करून एकूण १४ गुन्हे उघड केले आहेत.

पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामिण व रायगड पोलीस अधिक्षक यांचे कार्यक्षेत्रामध्ये रात्रीचे वेळी गाईंना निर्जनस्थळी व माळराणावर चोरुन घेवून जाऊन त्यांना गुंगीकारक इंजेक्शन देऊन बेशुध्द करुन त्यांची कत्तल करुन त्यांचे मास घेवून जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. सदरचे आरोपी २ ते ३ तासामध्ये हा सर्व प्रकार करुन फरार होत असत त्यामुळे सदर गुन्हयांचा तपास अतिशय कौशल्याने करणे गरजेचे होते.
त्याअनुषंगाने दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. ४८४ / २०२२ भा.द.वि. कलम ३८०, ४२९, ३४ सह प्राणी संरक्षण अधि सुधारणा सन २०१६ कलम ५.५(अ). ५ (ब). ६.९ सह भारतीलय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (अ) १३५ मधील पाहिजे आरोपी यांचा विधी पोलीस ठाणेचे पोउनि भदाणे व त्यांचे पथकाने सतत दोन महीने मुंबई, ठाणे, पुणे येथे सापळा रचुन तसेच तांत्रिक विश्लेषन व कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी नामे १) मोशीन बाबू कुरेशी २) शाहिद रहेमान कुरेशी ३) मोह, अब्दुल रहमान कुरेशी ४) आशराफ सलमान कुरेशी ५) मोह, आरिफ सलमान कुरेशी ६) सोहेल फारुक कुरेशी ७) राहुल पंडीत उर्फ राहुल मैया उर्फ राहील महंमद कुरेशी (८) मोशीन शरिफ कुरेशी ९) जाफर सुजीतकुमार सुभाषचंद्र पानीगृही अशा एकूण ९ आरोपींना ताब्यात घेतले आले असून नमुद आरोपी यांच्याकडून तीन वाहने (एन्जॉय, इनोव्हा, ऍक्सिन्टी महिंद्रा ) तसेच गुन्हयात वापरलेले कार्यते, सत्तुर, नायलॉन च्या दो-या, इंजेक्शन औषधाची बाटली, नंबर प्लेट असा एकूण २५,२०,९८०/- रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी यांचेकडून १४ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नमुद आरोपी यांचा खुनाचा प्रयत्न, दंगल तसेच गाईच्या चोरी तस्करी अशा इतर प्रकारचे २९ गुन्हयात सहभाग असल्याचे निदर्शनात आले आहे. त्याअनुषंगाने सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. मनोज लोहिया गा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ श्री. विवेक पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्रीमती. प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप शिंदे, दिघी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनील भदाने, पोहवा ७३५/ फलके, पोहवा ८०१/ पोटे, पोहवा १०२० कांबळे, पोहवा ११६८ जाधव, पोना १५७१ विधाते, पोना १५७२ जाधव, पोना १६६५ नवगिरे, पोशि २०१२ दहिफळे, पोशि २०९४ जाधव, पोशि २५५८ शिंदे तसेच मपोना १६२० भाग्यश्री जमदाडे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

45 mins ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

12 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

12 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

12 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

13 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

13 hours ago