नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सध्या विवादित संत बागेश्वर बाबा यांचा काल मुंबई येथील मीरा रोड येथे दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात हजारो भक्तांनी हजेरी लावली. यावेळी महिलांची संख्या प्रचंड मोठी होती. पण या दरबारात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या दरबारात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालून अनेक महिलांना लुटल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईच्या मिरा रोड परिसरात शनिवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खुप विरोध झाला होता. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. मीरा रोड येथे बागेश्वर बाबा यांचे प्रवचनही प्रवचन ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांची झुमड आली होती. त्यामुळे बाबांच्या दरबारात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी एवढी होती की बसायलाही जागा नव्हती. गर्दीमुळे या भागात काही प्रमाणात रेटारेटीही झाली. गर्दीला आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यात पोलिसानं बरोबर काही नागरिकांची रेटारेटी पण झाली. एकीकडे या गर्दीला आवरण्याच्या कामात पोलीस मग्न झालेले असतानाच दुसरीकडे चोरांनी या गर्दीचा फायदा घेत हाथ की सफाई केली. चोरट्यांनी दरबारात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लंपास केल्या. त्यामुळे दरबार संपल्यानंतर महिलांनी मीरा रोड पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आल्या होत्या.
काल सायंकाळी 5.30 वाजता बागेश्वर बाबांचा दरबार सुरू झाला. रात्री 9 वाजता त्यांचा दरबार बंद झाला. दरबार संपल्यानंतर लोक घराकडे निघाले. पण जवळपास 50 ते 60 महिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आल्याने पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. मात्र, त्यानंतर महिलांनी जे सांगितलं त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले. कार्यक्रमाच्यावेळी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन चोरांनी लंपास केल्याची तक्रार या महिलांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 36 महिलांनी त्यांचे दागिने लंपास झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या महिला वैतागलेल्या आणि संतापलेल्या होत्या. या तक्रारीचा आकडाही वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 4 लाख 87 हजार रुपये किमतीचे त्यांचे दागिने चोरीला गेले आहेत. या महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मीरा रोड येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दोन दिवस प्रवचनाचा कार्यक्रम आहे. काल हा कार्यक्रम पार पडला.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…