पिंपरी चिंचवड: पिस्टल व गांजा सह सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या.

डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिध

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- पिस्टल व गांजा सह एका सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारसह पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल गांजा आणि दुचाकी असा एकूण ०१ लाख३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मयूर अनिल घोलप (वय- २९ वर्षे रा. लक्ष्मी गंगा अपार्टमेंट फ्लॅट नं. १९,बागेची तालीम चिंचवडगाव पुणे सध्या रा.पुसाणे, ता. मावळ ,जि.पुणे) शंभू संजय गंगावणे वय२१ वर्षे, रा. धोंडेवाडी, पाचवड फाटा, कराड जि.सातारा) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

अटक केलेल्यांमध्ये मयूर घोलप हा आरोपीपोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दरोडा, खून करण्यासाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न, बेकायदेशीर पिस्टल बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे ०७ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तांच्या हद्दीतील फरारी व तडीपार आरोपी तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पोलीस आयुक्तच्या आदेशानुसार शनिवार (ता. १८) रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या अधिपत्या खाली सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे स्टाफसह हिंजवडी ,मारुजी, कासरसाई भागात पेट्रोलिंग करून मावळ भागातील पुसाणे येथे आले असता सहायक पोलीस निरीक्षक खाडे यांना माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मयूर घोलप हा त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून पुसाने गावाकडे येत असून त्याच्याकडे पुस्तक आणि गांजा आहे.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे आणि स्टाफ पुसाणे गावातील सितमाला बंगल्यासमोरील रोडवर सापळा रुचून दुचाकीवरून आलेला आरोपी मयूर घोलप आणि श्याम भाऊ गंगावणे यांना ताब्यात घेतले त्यांचे अंगझडती घेतले असता आरोपी मयूर घोलप यांच्याकडे ४०हजार रुपये किमतीचे एक पिस्टन ६५ हजाराची एक दुचाकी आणि शंभू गंगावणे यांच्याकडे ३१ हजार किमतीचा १२४० ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण ०१ लाख ३६हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे येथे दोघेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधावणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण काटकर, रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश मावसकर, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

17 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago