वर्धा: विज्ञान जत्रेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, बालकांशी साधला संवाद वर्धा जिल्हाभरातील 150 विद्यार्थी सहभागी.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी. विज्ञान विषयामध्ये कुतुहल, उत्सुकता व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या जत्रेला भेट दिली व बालकांशी संवाद साधला.

विज्ञान जत्रा या उपक्रमासाठी जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते आठवीच्या 150 विद्यार्थ्यांनी चित्रकला, मातीकाम, पौष्टिक आहार, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन, मुक्त अभिव्यक्ती व योगासने या सात दालनाच्या माध्यमातून आपआपल्या आवडीनुसार उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध जागतिक समस्या जसे जागतिक तापमान वाढ, पर्यावरणाचा ऱ्हास इत्यादी विषयावर चित्रे काढण्यात आली. मातीच्या साह्याने विविध विज्ञान खेळणी तयार करण्यात आली. पौष्टिक आहाराचे महत्व, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना आरोग्यासाठी योगाचे महत्व व मुक्त अभिव्यक्तीच्या माध्यमातून विविध विषयावर नाटक व विज्ञान गिताच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.
सदर विज्ञान जत्रेला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवने यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विज्ञान जत्रेचे उद्घाटन क्रिडापटू जानवराव लोणकर यांच्याहस्ते करण्यात आले. विज्ञान जत्रेस राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर येथील अधिव्याख्याता डॉ. सिमा पुसदकर व डॉ. उर्मिला हाडेकर यांनी सुध्दा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान जत्रेस संस्थेतील वरीष्ठ अधिव्याख्याता रत्नमाला खडके, नितू गावंडे, मंजुषा औंढेकर तसेच दिपाली बासोळे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणुन प्रतिभा देशपांडे यांनी काम पाहिले.
विज्ञान जत्रेस केसरीमल कन्या विद्यालय, न्यू इंग्लीश हायस्कुल, रत्नीबाई माध्यमिक विद्यालय, स्वावलंबी कन्या विद्यालय, कमला नेहरु विद्यालय, यशवंत विद्यालय सेवाग्राम, यशवंत विद्यालय वायगाव, स्वावलंबी विद्यालय खरांगणा, दीपचंद विद्यालय सेलू, जनता विद्यालय देवळी, भारत विद्यालय हिंगणघाट, डॉ. बी.आर.आंबेडकर विद्यालय हिंगणघाट, घटवाई विद्यालय वडनेर व मुक्ताबाई विद्यालय समुद्रपूर या शाळांनी सहभाग नोंदविला, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

38 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

1 hour ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago