विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये कर्मवीर अण्णांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी केलेला त्याग कौतुकास्पद आहे. त्यांच्या अश्रूंनी किमया घडवली आणि रयत शिक्षण संस्था उभी राहिली. जी आज समाजातील तळागाळाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असल्याचे प्रतिपादन निर्मला लावरे त्यांनी केले.
निर्मला लावरे या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालया मध्ये आयोजित लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेसाठी घेतलेले विशेष परिश्रम आणि त्यांना वहिनींनी दिलेली मोलाची साथ ही अत्यंत प्रेरणादायी आहे. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सणासुदीचे गोडधोड जेवण मिळावे यासाठी सौभाग्य अलंकार गहाण ठेवणारी ती एकमेव स्त्री आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रमोद तोरणे यांनी केले. तर प्रमुख वक्त्या छाया जेजुरकर यांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे जीवन कार्य विशद केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जालिंदर गायकवाड, सखाराम शिंदे, ज्ञानेश्वर केदार, संतोष कदम, संतोष सोनवणे, सचिन चौधरी, किरण आंबेकर, वामन घोडसरे, कृष्णकांत अंत्रे, ज्ञानेश्वर राजळे, सुनील बोठे, रंजय कडू, अनिल घोडेकर, राजाराम थोरात, वृषाली बेल्हेकर, अर्चना हासे, सुमन कणसे यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी सेवकवृंद व विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कविता घोडसरे यांनी केले तर आभार प्रतिक्षा थोरात यांनी मानले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…