प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवतीर्थ ) येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण १०२ बॉटल रक्तदान करण्यात आले. यावेळी सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज व सेवाग्राम येथील कस्तूरबा गांधी रुग्णालयाच्या चमूने रक्त संकलन केले.
सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांचा प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवस युवकांनी न विसरता छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून प्रेरणा घेण्याच्या दृष्टीकोनातुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. मागील तीस दिवस बलिदान मास पाळत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत रक्तदान केले.सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजत पर्यंत रक्तदान शिबिर सुरू होते.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा हिंगणघाटचे प्रशांत लोणकर, मोरेश्वर पिंपळशेंडे, जगदीश लोणकर, प्रदून्य निखाडे, यतीश मांडवकर, सुनिल ठाकरे, रोशन नागमोते, दिपक लोणकर, शंकर लेदे, शुभम वैतागे, गजू नौकारकर, अमित वाढई, प्रशांत बारई, पवन शर्मा, प्रकाश भलमे, प्रेम चिरकुटे, वैभव बोटकेवार, बबलू खेनवाल, नितीन हिंगमीरे, अमित देवडे, रणजित कछवा, प्रज्वल निखाडे, साहिल भुते, संदीप नासरे, कार्तिक मांडवकर, राहुल बुटले, कुणाल ढोणे, प्रितेश डफ, आर्यन डांगरे, शिव कोटकर, लोकेश मदनकर, अंकुश दरोळी, अविनाश लोखंडे, प्रदून्य इटनकर, कोमल ढोणे, गायत्री लोणकर, मोना कान्हेरकर, राखी मांडवकर, सीमा आडे, तृप्ती सोरटे आदींनी परिश्रम घेतले.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…