स्वातंत्र दिनी आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने महाराष्ट्र हादरला.

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
औरंगाबाद, दि.15 ऑगस्ट:-
आज देशात आणि राज्यात 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आहे. पण औरंगाबादमधून महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका गावात संतापजनक घटना घडली आहे. एका गावात आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. कन्नड ग्रामीण पोलिसांनी या सहाही नराधम आरोपींना बेळ्या ठोकल्या असून, यात एका विधीसंघर्ष बालकाचाही समावेश आहे.

कन्नड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. विशेष म्हणजे, यातील काही आरोपींकडून यापूर्वीसुद्धा पीडित मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. परंतु घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मुलीने घरी सांगितले नाही. त्यामुळे या नराधमांच्या अजुन हौसला वाढला त्यामुळे या पीडितेच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधम तिला धमक्या देत होते.

नराधम धमकी देत असल्यामुळे पीडित मुलीची या अत्याचाराबाबत कुणाला सांगायची हिंमत झाली नाही. मात्र आता सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्यामुळे वेदना असह्य झाल्या आणि त्यानंतर या मुलीने ही संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. आपल्या लेकीसोबत घडलेल्या घटनेमुळे आईला तर धक्का बसला. तिने क्षणाचाही विलंब न करता कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि मुलीसोबत झालेली हकीकत सांगितली आणि या सहा नराधमांविरोधात तक्रार दाखल केली.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर पोलिस या गंभीर घटना बघता ग्रामीण पोलिसांनी तातडीन कारवाही सुरू केली आणि सहा आरोपींना कन्नड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये किरण साहेबराव गोंडे वय 32 वर्षे व अरुण कैलास दरेकर वय 31 वर्षे या दोघांनी तिच्यावर जबरी बलात्कार केला. तसंच यापूर्वीही आरोपी किरण आणि अरुण याच्यासह श्रीकांत अशोक जाधव वय 33 वर्षे, गोविंद नेमीनाथ शेळके वय 29 वर्षे, संकेत जगन जाधव वय 19 वर्षे आणि एका विधिसंघर्ष बालकानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेने औरंगाबाद पाठोपाठ महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

14 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago