पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार व मा सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच अवैध धंदयाबाबत माहिती काढून कठोर कारवाई करण्याकरीता विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे कडील अधिकारी व अंमलदार हे कोंढवा पो.ठाणे, पुणे कार्यक्षेत्रात पेट्रालिंग करीत असताना पोलीस अंमलदार पांडुरंग पवार यांना मिळालेले बातमीचे अनुषंगाने दि. २१/०३/२०२३ रोजी पुणे-उंड्री येथील अॅस्टोनिया क्लासिक सोसायटी शेजारील सार्वजनिक ठिकाणी एक परदेशी नागरीक वय ५२ वर्षे सद्या रा. भवानी कॉम्प्लेक्स, सर्व्हे नं.४४/१, उंड्री वडाची वाडी, पुणे यास संशयावरुन ताब्यात घेतले असता, त्याचे ताब्यात एकुण रु. ५,४७,६००/- चा ऐवज त्यामध्ये त्याचे ताब्यात २३ ग्रॅम १३० मिलीग्रॅम कोकेन कि रु४,६२,६००/- चे एक मोबाईल फोन कि रु १०,०००/- चा एक दुचाकी गाडी कि.रु. ७५०००/- चा असा ऐवज व कोकेन हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आलेला असुन सदरचा अंमली पदार्थ हा त्याने त्याचे एका परदेशी साथीदाराकडुन विक्री करीता आणला असल्याची माहिती मिळालेने, त्यांचेविरुद्ध कोंढवा पो.ठाणे, पुणे गुरनं. ३०७/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ) . २१ ( ब ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन, नमुद आरोपीस अटक करुन पुढील तपासकामी कोंढवा पो.ठाणे, पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे,
तदनंतर पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना त्यांचे बातमीदाराकडुन एक परदेशी नागरीक हा कोढवा येथील रहावे घरातुन कॅथा इडुलिस खत हे अंमली पदार्थ विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती दिलेने, दि.२२/०३/२०२३ रोजी डि विंग फ्लॅट नं. ६०२, परफेक्ट फॉरर्च्छन सोसायटी, कोंढवा बु. सोमजी बसस्टॉप पुणे या ठिकाणी एक परदेशी नागरीक वय-२९ वर्षे, रा. डि-विंग, परफैक्ट फॉरर्म्युन सोसायटी, कोंढवा बुद्रुक, पुणे हा राहत असलेल्या परात सर्व कायदेशिर सोपस्कार पूर्ण करून छापा कारवाई केली असता, त्याचे ताब्यात एकूण रु.८, ७३,५१०/- चे एकुण ०८ किलो ३९३ ग्रॅम “कॅथा इडुलिस खत” हा अंमली पदार्थ, तसेच कि.रु. ५,८७,५१०/- अंमली पदार्थ, रोख रुपये २,७०,०००/- व परदेशी चलन, एक मोबाईल फोन कि रु १५,०००/- चा एक इलेक्टॉनिक वजन काटा, कि रु. १,०००/- चा असा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्री करता जवळ बाळगताना मिळुन आलेने त्याचेविरुद्ध कोंढवा पो. ठाणे, पुणे गुरनं ३०९ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ), २१(ब), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करुन नमुद आरोपीस परदेशी आरोपीस अटक करून पुढील तपासकामी હોઢના પોતા પુો સાથે તાત તેમાં બાનેને માટે.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शन व सूचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पो निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोउनि शुभांगी नरके, पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, विशाल दळवी, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, सचिन माळवे, राहुल जोशी, नितेश जाधव, विशाल शिंदे, संदेश काकडे, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, नितीन जगदाळे यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…