पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-3 ची कामगिरी
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १८/३/२०२३ रोजी रात्री १२.३० वा. सुमारास फिर्यादी सिध्देश गोवेकर रा. वडमुखवाडी ता. हवेली जि.पुणे हा मोटर सायकलवर बिआरटी रोड काळे कॉलनी समोरुन वडमुखवाडी बाजुस जात असताना इसमनामे हरीओम पांचाल वय २० वर्षे याने त्याचे एका साथीदारासह मोटर सायकलवरती येवून फिर्यादी याचा पाठलाग करून हरीओम पांचाळ याने त्याचे ताब्यातील बंदुक फिर्यादीचे दिशेने रोखुन दोन गोळ्या झाडुन फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. १०९ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०७३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आम्ही गुन्हे शाखेकडील सर्व तपास पथकांचे वेगवेगवेगळे तपास टिम तयार करुन तपास पथकांना सदर गुन्हयातील आरोपींना अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या. गुन्हे शाखायुनिट ३ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोशि/ २३९९ बाळसराफ, पोशि/ २२९६ जैनक, पोशि/ १२८१ कोळेकर, पोशि/ २८७७ मेगरळ, पोशि/ १९४० हनमंते, पोशि/ २००१ नांगरे, पोशि/२८८३ काळे असे मा. वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वरील नमुद गुन्हयाचा समांतर तपासाचे अनुशंगाने सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी हरीओम पांचाळ रा. दिनानाथ मंगलकार्यालयाचे शेजारी वडगाव रोड आळंदी देवाची ता. खेड जि.पुणे याचा शोध घेत असताना पोशि मेरगत व पोशि/१२८१ कोळेकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ” सदर गुन्हयातील आरोपी हा त्याचेकडील मोटर सायकल सह बाहेर गावी पळून जाण्याचे तयारी असून तो अलकापुरम रोड, वडमुखवाडी ते खड़ी मिशिनकडे जाणारे रोडने मोटर सायकलवर जाणारा आहे अशी अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर आरोपीस सापळा रचुन शिताफीने गुन्हे शाखा युनिट ३ कडील तपास पथकाने ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल तपास करुन त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र मुन्ना शेख रा. काळे कॉलनी च-होली ता.हवेली जि.पुणे याचेसह मागील झालेल्या भांडणाचे कारणावरुन केल्याची कबुली देवून त्याचे अंगझडती मध्ये त्याने गुन्हयात वापरलेले एक पिस्तोल व ०१ जिवंत काडतूस, गुन्हयात वापरलेली मोटरसायकल तसेच त्याचेकडे मिळून आलेला मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे त्याचे कडे मिळुन आलेला मोबाईल बाबत दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. 930/2021 भा.दं.वि. कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वरील प्रमाणे 1) दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. १०५/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५ २) दिधी पोलीस ठाणे गु.र.नं. 330/2021 भा.दं.वि. कलम 380 असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर आरोपीस पुढील कारवाईकामी दिघी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहीया, मा. अपर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती स्वप्ना गोरे. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार सचिन मोरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुचिर दांगट, शशिकांत नांगरे, समीर काळे, रामदास मेरगळ, महेश भालचिम, निखिल फापाळे, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…