अवैधपण चालणान्या गावठी हातभटटी वारुच्या अड्डयाचे लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडुन करण्यात आले समुळ उच्चाटन एकुण २२,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला नष्ट

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक व अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दशहत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५ श्री विक्रांत देशमुख यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करणे बाबतचे आदेश देऊन सदर कारवाई बाबत मार्गदर्शन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील अधिकाऱ्यांना केले. त्यानंतर मा. श्री. दत्तात्रय चव्हाण, वपोनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे यांनी सदर अवैध घदयांबाबत माहिती घेतली ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जात नाही अशा ठिकाणी जंगलामध्ये निर्जनस्थळी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे काम राजरोसपणे चालू असलेबाबत त्यांना माहिती मिळाली.

लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पो.ना ६४८२ देवीकर यांना गोपनिय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, भवरापुर गावचे हदीत टिळेकर वस्ती जवळ ओढ्यालगत आडोशाला, ता. हवेली, जि. पुणे येथे एक पुरुष हा जमिनीत घेतलेल्या खड्यामध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन आपले जवळ बाळगुन लाकडी काठीने ढवळत आहे सदर वातमीचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कडील अधिकारी, अंमलदार यांचे सोबत चर्चा करून नियोजनबद्ध पथक तयार करून लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात भवरापुर गावचे हद्दीत टिळेकर वस्ती जवळ ओढ्यालगत आडोशाला, ता. हवेली, जि. पुणे येथील अवैध गावठी हातभट्टी दारु भट्टीवर धडक कारवाई करुन भवरापुर गावचे हद्दीत टिळेकर वस्ती जवळ ओढ्यालगत आडोशाला, ता. हवेली, जि.पुणे येथील गावठी हातभट्टीवर कारवाई करून जमिनित खड्डे करून अंदाजे दोन हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पत्र्याचे भांडे असे अंदाज २२०००/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी नष्ट केला. याप्रमाणे कारवाई करून अंदाजे एकुण २२,०००/- रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा व दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य नष्ट करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान गावठी हातभट्टी चालवणारे इसम नामे १) अरविंद रामलाल राजपुत, वय ५४ वर्षे, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि.पुणे यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, श्री दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पो.हवा ४३२ गायकवाड, पो.ना ७३३५ नागलोत, पो.ना ६४८२ देवीकर पो.शि. १२००५ शिरगीरे, पो.शि ४७११ कुदळे, पोशि पवार, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचेकडील अधिकारी व स्टाफ यांच्या पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

9 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

9 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

9 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

9 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

9 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

9 hours ago