नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- दिनांक 24 मार्च 2023 रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने, क्षयरोग तज्ञ डॉ. बालनाथ चकोर, डॉक्टर्स व नर्स उपस्थित होते.
सदर कार्यक्रमादरम्यान महापालिका डॉक्टर्स, नर्स यांच्या माध्यमातून क्षयरोग निर्मूलन जनजागृती करणेकामी पथनाट्य सादर करण्यात आले. सदर पथनाट्यात क्षयरोग असल्याचे लक्षणे आढळून आल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात भेट देऊन उपचार करून घेण्याची माहिती देण्यात आली. भारत देश, महाराष्ट्र राज्य व मिरा भाईंदर शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी विविध प्रकारची उपचार पद्धती, शहरातील नागरिकांमध्ये जन जागृती करणेकामी मिरा भाईंदर महानगर पालिकेचे मोलाचे योगदान आहे.
क्षयरोग मुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांचे योगदान देखील महत्त्वाचे राहणार असल्याचे मा. आयुक्त यांनी सांगितले. तसेच केंद्र तसेच राज्य सरकारने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे धोरण निश्चित केले आहे. या मोहिमेंतर्गत मिरा-भाईंदर महापालिकेने 2022 मध्ये देशातल्या 80 जिल्ह्यांतून मिरा भाईंदर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करून घेणे, त्याचबरोबर आपल्या परिसरातील क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीची माहिती आरोग्य केंद्रात देण्याचे आवाहन मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…