पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २२/०३/२०२३ रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संतोष सिंग रामोशी पुणे यांनी फिर्याद दिली की, त्यांचेकडील सकून ऑटी प्रा. लि. या कंपनीचे मालकीचा टेम्पो नं. एमएच १४ केए ९६७९ हा दि. २१/०३/२०२३ रोजी कंपनीतील कामगार नामे अनिल यादव याने लबाडीच्या इरादयाने चोरी करून नेला वगैरे मजकुराची तकार दिले वरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं ३१४ / २०२३ भादवि कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, व चाकण पोलीस स्टेशनचे वपोनि श्री. वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील सपोनि श्री विक्रम गायकवाड यांना व तपास पथकास सदर चोरीस गेलेला टेम्पोचा शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यांनतर चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सपोफौ सुरेश हिंगे व पोना भैरोबा यादव यांनी तांत्रीक तपासाव्दारे व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती घेवून टेम्पो व आरोपीचा माग काढत टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून टेम्पो व आरोपी हे नाशिक येथे गेल्याचे समजल्याने त्याबाबत वरीष्ठांना त्याबाबतची माहीती देवून वरीष्ठांचे आदेशाने तात्काळ तपास पथक नाशिक येथे रवाना झाले व नाशिक येथील सातपूर पोलीस ठाणेच्या हददीत चोरीस गेलेल्या टेम्पोसह आरोपीला पाठलाग करून पकडले. व सदर गुन्हयात आरोपी नामे अनिल उर्फ कुरकुर श्रीनिवास यादव वय ३५ वर्षे रा पिंपरी पो रामनगर ता भनपुर जि बस्ती राज्य उत्तरप्रदेश सध्या राहणार चिनपाडा घनसोली यादवनगर झोपडपटटी जि. ठाणे यास अटक करण्यात आलेली आहे. त्याचेकडून चोरीस गेलेला टेम्पो नं एमएच १४ केए २६७९ एकूण ७,००,०००/- रू किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, चाकण पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सपोफी सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, पोकों / नितीन गुंजाळ, निखील वर्षे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर तांत्रीक विष्लेशन शाखेच्या भाग्यश्री जमदाडे यांनी केलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसंन्न ज-हाड हे करीत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…