चाकण पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडून चाकण एमआयडीसी परीसरातील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड एकूण ४,२१,०००/- मुददेमाल जप्त

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १०/०३/२०२३ रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे फिर्यादी पवनकुमारसिंह मॅनेजर सासवड हिट ट्रन्सफर कंपनी चे मागील खिडकीचे गज कापून कंपनीमधील ३५० किलो वजनाचे तांब्याचे धातूचे रोल अज्ञात चोरट्यांनी दि. १०/०३/२०२३ रोजी चोरी करून नेले वगैरे मजकुराची तक्रार दिले वरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टी नं २९२ / २०२३ भादवि कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त,प्रेरणा कट्टे तसेच चाकण पोलीस स्टेशनचे वपोनि श्री वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकास सदर अज्ञात चोरट्यांचा व चोरी गेलेल्या मालाचा शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यांनतर चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ परीसरातील तसेच घटस्थळावर येणारे जाणा-या रस्त्यावरील त्याच प्रमाणे चाकण परीसरातील सुमारे ५० पेक्षा जास्त ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी लक्षात आले की, सदर गुन्हयातील चोरटे हे रिक्षाने येवून कंपनीमध्ये घरफोडी केलेली असल्याचे तपास पथकास निदर्शनास आले. तपास पथकातील अधिकारी प्रसन्न जराड व पोलीस अंमलदार सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पो. हवा. (संदीप सोनवणे यांना गोपनिय बातमीदारांकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील संशईत दोन आरोपी, रिक्षासह गुन्हयातील माल घेवून आळंदी फाटा परीसरामध्ये माल विक्रीकरीता ग्राहक शोधत आहेत. सदरची बातमीनुसार तात्काळ तपास पथकाचे सपोनि श्री प्रसन्न जराड, सपोफो हिंगे, पोहवा संदीप सोनवणे, पोना कांबळे, पोशि भागवत, असे बातमीच्या ठिकाणी जावून संशईत दोन आरोपींना मालासह व रिक्षासह शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस करून सदरचा माल हा त्यांनीच चोरल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच सदरचे दोनही आरोपी हे प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील असल्याची खात्री झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्याची नावे १) अशोक विलास खिल्लारे वय २७ वर्षे रा. शांतीनगर भोसरी पुणे मुळ रा. लिंबागणेश पोखरी, ता जि बीड २) कबीर लालसींग गौर उर्फ राहूल वय २६ वर्षे रा. आळंदी फाटा गवते वस्ती चाकण ता खेड जि पुणे मुळ रा. आईनाचौडा, कासार, थाना उधारबंद, जि. सिलवर राज्य आसाम यांचकडून गुन्हयातील चोरीस गेलेला संपूर्ण माल जसाच्या तसा हस्तगत करण्यात आलेला असून गुन्हयातील वाहन रिक्षा नं. एम एच १४ एच एम ३४९१ ही जप्त करण्यात आलेली असून एकूण ४,२१,८४०/- रू किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसन्न ज-हाड हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, चाकण पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सपोफी सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्षे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर, तांत्रीक विष्लेशन शाखेच्या भाग्यश्री जमदाडे यांनी केलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

3 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

14 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

14 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

15 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

15 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

15 hours ago