संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- अभिधम्माच्या विविध पैलुवर रविवार 26 मार्च रोजी दीक्षाभूमी वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर आडीटोरियम मधे 12 ते 7 च्या दरम्यान पाचव्या आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी तथागत बुद्धाच्या धम्मानुसार मानव कल्याण व शांतीसाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना अवार्ड देऊन सन्मानित करण्यात येईल. अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संघकाया फाउंडेशनचे अध्यक्ष भंते प्रशिल रत्न यांनी पत्रपरिषदेत दिलेली आहे.
या कार्यक्रमात तथागत बुद्धाचा अभिधम्म, अभिधम्मात विविध व्यक्तींचे विश्लेषण, अभिधम्म आणि प्रज्ञा, अभिधम्माचे मनोवैज्ञानिक आयाम अशा विविध पैलूवर प्रामुख्याने चर्चा होईल. हे आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन नागपुरचे पाली विभूषण डॉ. बालचंद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. नागपूर विद्यापीठातील पालीच्या माजी विभाग प्रमुख डॉ. मालती साखरे, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील पाली विभाग प्रमुख डॉ मोहन वानखेडे, वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभाग प्रमुख डॉ सुरजित सिंग, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाली विभागाच्या सहाय्यक प्रोफेसर डॉ तलत प्रवीण व मुंबई विद्यापीठातील पाली विभागाच्या डॉ. शालिनी बागडे प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना शंभर रुपये, परिषदेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांना पाचशे रुपये व पेपर वाचन करणाऱ्यांना बाराशे रुपये नोंदणी फी आकारण्यात आलेली आहे.
या परिषदेचे आयोजक डॉ बीना नगरारे, डॉ प्रतिभा गेडाम, डॉ रूपा वालदे, डॉ अर्चना हाडके, एस एल शंभरकर, प्रशिल बलवीर, इंजिनियर पी एस खोब्रागडे, आकाश सोनटक्के, अभिनव पाटील हे आहेत.
बौद्ध धम्माच्या अभ्यासकांनी या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या प्रसंगी भन्ते प्रशिल रत्न यांनी केले आहे. याप्रसंगी पत्र परिषदेला त्यांच्यासोबत आयोजक समितीतील इंजिनीयर पी एस खोब्रागडे, पालीचे अभ्यासक उत्तम शेवडे व सिद्धार्थ फोपरे प्रामुख्याने उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…