प्रशांत जगताप, संपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- 18 मार्च 2023 ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ड्रीम स्टुडिओ व्हेंचर्स तर्फे एलबी हॉटेल सदर येथे क्वीन एरेना फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शो मध्ये दिव्यांग प्रगती येसुणसुरे यांनी चमकदार कामगिरी करून तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे लक्ष वेधले.
नागपुर येथील रंगलेल्या या भव्य रंगीबेरंगी फॅशन शो मध्ये अनेक प्रसिद्ध मॉडेलनी सहभाग घेतला होता. त्यात दिव्यांग प्रगती येसणसुरे यांनी पण सहभाग होऊन या फॅशन शो मध्ये जोरदार हजेरी लावली. त्यावेळी दिव्यांग प्रगतीने ब्लॅक रंगाचा गाउन घालून खूप छान पद्धतीने रैंप वॉक केला. उपस्थित जज आणि नागरिकांनी प्रगतीच्या रैंप वॉक आणि मेकअप ची प्रशंसा केली.
यावेळी प्रगती येसणसुरे यांनी महाराष्ट्र संदेश न्युज ला प्रतिक्रिया दिली. मी दिव्यांग असून मला माझ्या दिव्यांग असल्यामुळे मी कधीही स्वतःला कमजोर समजल नाही. माझं कुटुंब मला सपोर्ट करत असते त्यामुळे मी आज ही या फॅशन शो मध्ये भाग घेऊ शकली. मी शालेय जीवनापासुन विविध प्रकारच्या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होऊन त्यावर आपले नाव कोरले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. 2016 आली माझ्या वडिलांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर मी कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः एकटी प्रवास करून स्वावलंबी बनले.
स्टायलोसुप व सुप्रिया मॉडेलसाठी प्रेरणा.
स्टायलोसुप डिझायनर स्टुडिओच्या ऑनर सुप्रिया ढोके यांनी माझ्या साठी सुंदर मेकअप आणि ड्रेस साठी खूप मेहनत घेतली. सुप्रिया मॅडम या उच्च दर्जाच्या फॅशन डिझायनर तसेच कॉस्तुम डिझायनर आहेत त्यांनी अनेक चित्रपटात नायक नाईकेचे हेयर स्टाईल आणि ड्रेस डिझाईन केले. त्यांचा या क्षेत्रातील दांगडा अनुभवामुळे मी आज या फॅशन शो मध्ये dsv queen Arena glamour चा टायटल मिळवला. सुप्रिया मॅडमचे ट्रॅडिशनल, वेस्टर्न व इन्डोवेस्टर्न या सर्व प्रकारच्या ड्रेस चे पॅटर्न खूप छान असतात. त्या अनेक नव मॉडेल साठी प्रेरणा देणाऱ्या आहेत
दिव्यांगासाठी प्रगती प्रेरणास्रोत…
मी माझ्या सर्व दिव्यांग मित्र मैत्रिणीला सांगू इच्छितो की, मनात ठाम विचार केला व स्वतःमध्ये काही करण्याची इच्छा असली तर कुठल्याही क्षेत्रात दिव्यांग व्यक्ती कधीही मागे पडत नाही. फक्त स्वतःमध्ये आत्मविश्वास असायला हवा दिव्यांग व्यक्ती देखील कुठल्याही क्षेत्रात स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकतो.
प्रगतीची जिद्द…
मी दिव्यांग असल्यामुळे माझ्या मैत्रिणीने मला सांगितल की, तू फॅशन शो मध्ये भाग नाही घेऊ शकत. हे शब्द माझ्या काळजाला भेदले आणि मी हे करू शकतो अशी जिद्द करून मी यासाठी तयारी सुरू केली. मी फक्त दिव्यांग असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाही अस मनात ठरवलं आणि मी अनेक फॅशन शो कार्यक्रमात सहभाग घेतला. आणि मला चांगला प्रतिसाद पण मिळाला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…