संगमनेर शहरात बँकेत व्यवस्थापकाने अनेकांशी संगनमत करून केला कोट्यवधींचा भष्ट्राचार 136 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- शहरात गायत्री सोसायटी येथे असणार्‍या दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँक लि. बँकेत सोने तारण घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. यात बँकेचे माजी व्यावस्थापक, व्हॅल्युअर आणि कर्जदार यांनी मिळून 4 कोटी 20 लाख 15 हजार 860 रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार गेल्या दोन वर्षांत घडला असून तब्बल 136 खातेदारांनी बनावट सोने ठेवून कर्ज काढले आहे.

तर आता यापैकी 12 जणांनी त्यांचे खाते बंद केले असून 136 जण अद्याप आरोपीच्या पिंजर्‍यात उभे आहेत. त्यामुळे बँकेच्या माजी अधिकार्‍यांसह एकूण 136 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अकोले, संगमनेर, नाशिक, पुणे अशा ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश असून या खळबळजनक माहितीमुळे बँक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत बँकेचे विद्यमान व्यवस्थापक निलेश वसंत नाळेगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, दि.1 नोव्हेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत योगेश बाळासाहेब पवार हे संगमनेर शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणुन काम पहात होते. त्यांच्या काळात या शाखेमार्फत सोने तारण कर्ज दिले जात होते. हे कर्ज ग्राहकांचे सोने बँकेत गहाण (तारण) ठेऊन दिले जाते. सदर सोने गहाण ठेवतांना अधिकृत व्हॅल्युअर मार्फत सोन्याचे बँक व्हॅल्युएशन करून घेतले जाते. तसा मुल्यांकनाचा शेरा व दाखला घेऊन बँक व्हॅल्युअरने दिलेल्या सोन्याच्या मुल्यांकनाचे आधारे कर्ज दिले जाते. अशा प्रकारे सोन्याचे दागिन्यांचे मुल्यांकन करण्यासाठी बँकेने जगदिश लक्ष्मण शहाणे याला अधिकृत व्हॅल्युअर म्हणून दि. 19 डिसेंबर 2014 रोजी नियुक्त केलेले होते. त्याने केलेल्या मुल्यांकनाच्या आधारे बँकेने विविध ग्राहकांना कर्ज दिलेले आहेत.

तरी, संगमनेर शहरात महाराष्ट्र ग्रामीण बँक, संगमनेर येथे काही सोने तारण कर्ज यात काही सोने खोटे निघाल्याचे अधिकार्‍यांना समजले होते. त्यामुळे त्याची चौकशी करण्याचे ठरविले होते. त्यानुसार बँकेने सर्व ग्राहकांना बँकेत सोने तपासणी करणेकामी उपस्थित राहणे बाबत लिखित स्वरूपात नोटीसा जाहिर केल्या होत्या. त्यानंतर बँकेने कर्जदारांच्या उपस्थितीत सोन्याची तपासणी केली. तसेच लेखी पत्र देऊनही जे ग्राहक सोने तपासणी कामी उपस्थित झाले नाहीत त्यांचे बाबत योग्य ती दक्षता घेऊन व्हीडीओ शुटींगमध्ये सोन्याची तपासणी बँकेचे दुसरे पॅनल व्हॅल्युअर यांचे मार्फत करण्यात आली.

तेव्हा लक्षात आले. की, कर्जापोटी ठेवलेले दागिने हे सोने नसुन ते खोटे असल्याचे निदर्शनास आले. एकंदरीत या फसवणुकीमध्ये बँकेचे व्हॅल्युअर जगदिश शहाणे व कर्जदार यांनी संगनमताने खोटे दागिने ठेऊन, विश्वासघात करून, बँकेची फसवणुक केली. यात एकूण 136 खातेदार आहेत त्यापैकी 12 खातेदारांनी त्यांचे कर्ज खाते बंद केलेले असून एकूण 124 खातेदार शिल्लक आहेत. यांच्याकडून 4 कोटी 20 लाख 15 हजार 860 रुपये येणे आहे, त्यामुळे बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी योगेश बाळासाहेब पवार यांचे कार्यकाळात सदर प्रकार घडला असल्याने त्यांच्यासह 153 जणांविरुद्ध शाखाधिकारी निलेश वसंत नाळेगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 224/2023 भारतीय दंड संहिता कलम 420, 406, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणेः-अकिला आजीज शेख (रा. कुरण, ता. संगमनेर), राजेश विश्वनाथ पवार (रा. कुरण, ता. संगमनेर), सचिन मरनलभाऊ होलम (रा. सय्यद बाबा चौक, संगमनेर), सागर भारत मंडलिक (रा. लक्ष्मीनगर आदर्शनगर, गुंजाळवाडी, ता. संगमनेर), ज्ञानेश्वर त्रंबक पगारे (रा. अमृतनगर, संगमनेर), आसिफ अल्लाउद्दीन शेख (रा. जहागीरदार वाडा, संगमनेर), तात्राबाई रावजी घुगे (रा. नाशिक-पुणा रोड, संगमनेर), मंगेश चंद्रकांत ढोले (रा. राजापूर रोड, संगमनेर), वैभव प्रकाश वाकचौरे (रा. प्रकाशनगर, हंगामनगर महानगरपालिका), रमेश बाबुराव गाडे (रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी, ता. संगमनेर), नितीन किसन साळुंके (रा. अमृतनगर, संगमनेर), सुधीर रावसाहेब घुगे (रा. अमृतनगर, संगमनेर), अमोल पोपट खेंगळे (रा. परदेशीपुरा, संगमनेर), कैलास रामनाथ शिरसाठ (रा. साखर कारखाना रोड), बाळासाहेब विष्णू मेंढे (रा. चैतन्यनगर, घुलेवाडी), दीपक बादशाह पवार (रा. धोंडीबा वस्ती, निळवंडे, ता. संगमनेर), स्वाती अनिल मंडलिक, सुदर्शन जनार्दन एंगुलडल (रा. मालदाड रोड, संगमनेर), मनोज कचरु परदेशी (रा. मालदाड गल्ली नं 3, वाल्मीक वसाहत, संगमनेर), योगेश शंकर सूर्यवंशी (रा. राजापुर रोड ढोलेवाडी संगमनेर), संजय दिलीप म्हैसे (रा. राजापूर रोड, घोडेकर मळा, संगमनेर), अनिल राजाराम पावबाके (रा. पावबाकी रोड, संगमनेर), शशिकला विश्वनाथ पवार (रा. घुलेवाडी, संगमनेर), रवींद्र रमेश राजगुरु (रा. गणेश विहार कॉलनी, संगमनेर), विशाल काशिनाथ वाकचौरे (रा. आदर्शनगर, घुलेवाडी, संगमनेर), रुपाली जीवन परदेशी (रा. देवाचा मळा, संगमनेर), अजयकुमार भाऊसाहेब थोरात (रा. वडगावपान, ता. संगमनेर), किशोर धोंडीराम रगडे (रा. कारखाना रोड घुलेवाडी, संगमनेर), योगेश रामनाथ वाकचौरे (रा. धांदरफळ बुद्रूक, ता. संगमनेर), संदीप भाऊसाहेब सानप (रा. कर्‍हे, ता. संगमनेर), प्रकाश मारुती तुपसुंदर (रा. माझेघर सोसायटी, घुलेवाडी संगमनेर), संदीप नंदू काळंगे (रा. फोफळे मळा, बडोदा बँक कॉलनी, संगमनेर), प्रतिक नानासाहेब केरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर), शशिकांत मिनानाथ पांडे (रा. इंजिनिअरींग स्टाफ क्वार्टर, घुलेवाडी, ता. संगमनेर), योगेश दत्तात्रय जाधव (रा. महात्मा फुले नगर, संगमनेर), प्रसाद संजय वर्पे (रा. अमृतनगर, कारखाना घुलेवाडी, संगमनेर), ज्ञानेश्वर ठकाजी येरमाळ (रा. संगमनेर खुर्द), रंजना गोरख पावबाके (रा. तिरंगा चौक, संगमनेर), शाम प्रल्हाद डहाळे (रा. तहसिल कार्यालय, संगमनेर), नंदा रमेश गाडे (रा. तेलीखुंट चौक, संगमनेर), लक्ष्मण विठ्ठल राऊत (रा. नवीन पाण्याची टाकी, घुलेवाडी), ज्योती दीपक कुलथे (रा. गल्ली क्र. 14, संगमनेर), मीना दिलीप भारती (रा. मालदाड रोड, संगमनेर), आयुब उस्मान पठाण (रा. रसाळ हॉस्पिटलच्या मागे, लखमीपुरा, संगमनेर), शरद मारुती परबत (रा. राजापूर रोड, ढोलेवाडी, संगमनेर), राहुल ज्ञानेश्वर गुरुकुले (रा. नाशिक रोड, पाटील मळा, संगमनेर खुर्द), उषा एस. दुधवडे (रा. सावरगाव, ता. संगमनेर), दीपक दादू आव्हाड (रा. मालदाड रोड, संगमनेर), निकिता विशाल वाकचौरे (रा. आदर्शनगर, घुलेवाडी), प्रियंका राजेंद्र वाकचौरे (रा. आदर्शनगर, घुलेवाडी), राजेंद्र काशिनाथ वाकचौरे (रा. नाशिक रोड, स्टेटस हॉटेल जवळ, संगमनेर), मारुती आण्णासाहेब मंडलिक (रा. माळीनगर, संगमनेर), लखन शांताराम कडलग (रा. डी. के. मोरे विद्यालय, वडगावपान, संगमनेर), गोरक्ष आर गाडेकर (रा. मनोली, ता. संगमनेर), प्रमोद सुदाम वाहुळ (रा. घुलेवाडी, संगमनेर), योगिता योगेश बुधलकर (रा. पुर्नवसन कॉलनी, संगमनेर), मारुती लिंबा खेमनर (रा. खेमनर वस्ती, डिग्रस, ता. संगमनेर), मनोज मच्छिंद्र ढमाले (रा. घुलेवाडी, संगमनेर), नवनाथ चंद्रभान खंडाळे (रा. डिग्रस, ता. संगमनेर), रवींद्र ज्ञानदेव जाधव (रा. साकुर रोड जाधव वस्ती, पानोडी, ता. संगमनेर), पुष्पा राजेश पवार (रा. संगम सोसायटी, घुलेवाडी), राहुल शिवाजी गायकवाड (रा. घोडेकर मळा, संगमनेर), पुष्पा ज्ञानेश्वर गुरुकुले (रा. पाटीलमळा, संगमनेर), संकेत भास्कर पगारे (रा. गावठाण चिंचोलीगुरव, ता. संगमनेर), रोहिणी सुभाष गडाख (रा. अमृतनगर), स्वप्नील भास्कर पगार (रा. गावठाण चिंचोलीगुरव), सागर धिरज परचे (रा. म्हसोबा नगर, अमृतनगर, घुलेवाडी), सारिका सतीष पोटे (रा. घुलेवाडी), साक्षी सतीष पोटे (रा. घुलेवाडी), संदीप बाळासाहेब गुळवे (रा.वेल्हाळे, ता. संगमनेर), रंजना गोरख पावबाके (रा. तिरंगा चौक, संगमनेर), विजय रामनाथ पावसे (रा. हिवरगावपावसा, संगमनेर), राजेंद्र कारभारी पवार (रा. ढोलेवाडी, संगमनेर), सुरज उत्तम जाधव (रा. अमृतनगर कॉलनी घुलेवाडी), सुनील खंडू बटवाल (रा. ढोलेवाडी, संगमनेर), शालिनी प्रमोद वाव्हळ (रा. घुलेवाडी), मिनिनाथ राजाराम सानप (रा. निमोण, ता. संगमनेर), सिद्धार्थ संतू दारोळे (रा. राजवाडा, संगमनेर), भानुदास यशवंत ढगे (रा. घुलेवाडी), मंगेश रावसाहेब घुगे (रा. नांदूरशिंगोटे), मनोज राजेंद्र बांगर (रा. जवळेकडलग, ता. संगमनेर), विनोद भानुदास ढगे (रा. शिंदवड, पिंपळगाव खांड, ता. अकोले), ज्योत्सना प्रशांत भुजबळ (रा. लेन नं. 3 गणपती मंदिर, संगमनेर), जय तेपेंद्रबहादूर सुनार (रा. घोडेकर मळा, संगमनेर), अरविंद मारुती पावसे (रा. अर्खडी वस्ती, हिवरगावपावसा, ता. संगमनेर), प्रकाश विश्वनाथ पवार (रा. घोडेकर मळा, संगमनेर), स्वाती प्रकाश पवार (रा. साईनगर, गल्ली नंबर 1, संगमनेर), चंचल रमेश गोडे (रा. तेलीखुंट चौक, संगमनेर), काजल प्रतिक कोरे (रा. शिर्डी रोड, मोठेबाबा मंदिर, निळवंडे, ता. संगमनेर), विजय भास्कर अवचिते (रा. पावबाकी रोड, संगमनेर), सुरेश फकिरा भालेराव (रा. मालुंजे, ता. संगमनेर), संदीप गोरक्ष अवचिते (रा. शिबलापूर रोड, मालुंजे), सोमनाथ भीमराज जाधव (रा. मालुंजे), सचिन जगन्नाथ अवचिते (रा. मालुंजे, ता. संगमनेर), गजला आयुब पठाण (रा. देवीगल्ली, लखमीपुरा, संगमनेर), नवनाथ भारत घोडेकर (रा. मालपाणी हेल्थ कल्ब, संगमनेर), मच्छिंद्र एकनाथ मंडलिक (रा. संगमनेर), सुषमा मच्छिंद्र मंडलिक (रा. पुर्व भाग गल्ली क्र. 3, संगमनेर), रितेश संतोष साळवे (रा. घुलेवाडी, संगमनेर), रंजना प्रकाश तुपसुंदर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), कृष्णा भाऊसाहेब गाढवे (रा. पाण्याच्या टाकीजवळ गावठाण, घुलेवाडी), रविंद्र दत्तु घोडेकर (रा. मालपाणी हेल्थ क्लब जवळ घोडेकर मळा), किरण रघुनाथ राहाणे (रा. राहाणे मळा, संगमनेर), नवनाथ मारुती ढोले (रा. वेताळ बाबा मंदिर जवळ, घोडेकर मळा, ता. संगमनेर), डिंपल संतोष वालझाडे (रा. रंगारगल्ली, संगमनेर), कोमल संजय भोसले (रा. दत्त मंदिर रोड, आदर्श कॉलनी वाकड, ता. हवेली, जिल्हा पुणे), दानिश अय्युब पठाण (रा. अमृतनगर, घुलेवाडी), योगिता राहुल गुरुकुळे (रा. पाटील मळा, पुणे-नाशिक रोड, संगमनेर खुर्द), संतोष माधव लहरे (रा. टाकीजवळ, घुलेवाडी), माधव दादा लहारे (रा. टाकीजवळ, घुलेवाडी), गणेश भाऊसाहेब अवचिते (रा. गोसावी मळा, मालुंजे), नामदेव भीमराज जाधव (रा.जाधव वस्ती, मालुंजे), सुनील गंगाधर ताम्हाणे (रा. अकोले नाका, संगमनेर), राजू एकनाथ बोरकर (रा. जनतानगर गल्ली क्र. 5, संगमनेर), उषा माधव लहरे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, घुलेवाडी), महेश रामचंद्र जोशी (रा. अभियांत्रिकी कॉलेज जवळ, घुलेवाडी), ज्योती महेश जोशी (रा. अभियांत्रिकी कॉलेज जवळ, घुलेवाडी), मिना कैलास गोफणे (रा. विटभट्टी पाटील मळा, संगमनेर खुर्द), प्रशांत मच्छिंद्र पावबाके (रा. महादेव मंदिर, माळीनगर पावबाकी रोड, संगमनेर), गणेश सुर्यभान खेमनर (रा. भालेराव वस्ती डिग्रस, संगमनेर), सचिन मोहन उपरे (रा.शिवाजीनगर, देशमुख हॉस्पीटलजवळ, संगमनेर), मुकुंद मुरलीधर उपरे (रा. शॉप नं. 32, महात्मा फुले कॉम्प्लेक्स माळीवाडा, संगमनेर), कैलास सोमनाथ गोफणे (रा. माळीनगर, सातपुते मळा, संगमनेर), राहुल बिजराज गुळवे (रा. हरिबाबा वाडी, संगमनेर), भाऊसाहेब जगन्नाथ पवार (रा. ओझर खुर्द, ता. संगमनेर), संतोष सखाराम सुर्यवंशी (रा. विठोबा गल्ली, घुलेवाडी), अमृतराज किसन वाघमारे (रा. बोधकर किराणा, खराडी, ता. संगमनेर), संजय कुंडलिक साळवे (रा. जयजवान चौक, इंदिरानगर, संगमनेर), सुनिल रघुनाथ अवचिते (रा. घुगे वस्ती, म्हाळुंगे, ता. संगमनेर), विशाल विठ्ठल कुंडल (रा. साखर कारखाना परिसर, अमृतनगर), रवि महेश श्रीवास (रा. माधव थेटरचे मागे वाडेकर गल्ली, संगमनेर), विजय बाळासाहेब धुलसुंदर (रा. मनोली, ता. संगमनेर), सुलताना आयुब पठाण (रा. लखमीपुरा, संगमनेर), जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), योगेश बाळासाहेब पवार (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर)

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago