केंद्र सरकारचे काऊंट डाऊन सुरू काँग्रेस शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांची केंद्र सरकारवर टीका.

डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:- राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हा दिवस भारतीय लोकशाहीचा काळा दिवस म्हणून गणला जाईल. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळे सरकारचे आता काउंटडाऊन सुरू झाले आहे अशी टीका पिंपरी-चिचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास यांनी केली.

पिंपरी येथे शहर काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कैलास कदम बोलत होते. या आंदोलन प्रसंगी जेष्ठ नेते मानव कांबळे, गौतम अरगडे, अभिमन्यू दहीतुल्ये, महिला शहराध्यक्ष सायली नये, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे,युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले व मागासवर्गीय शहराध्यक्ष सचिन ओव्हाळ यादी उपस्थित होते.

यावेळी कदम म्हणाले की काँग्रेस पक्ष हा देशाची लोकशाही टिकवण्यासाठी बलिदान देऊन सक्षमपणे उभा असलेला पक्ष आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करून कायदा मानणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. काँग्रेसला बलिदानचा इतिहास आहे. राहुल गांधी यांची नेतृत्व दाबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.

संसदेत केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी बेकायदा पद्धतीने राहुल गांधी यांचे खासदार पद संपुष्टात आणले .सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने सत्र न्यायालय उच्च न्यायालय अपील करण्याची मदत दिली असताना देखील केंद्र सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकी रद्द केली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते विचलित होणार नाहीतर उलट केंद्र सरकार, शेतकरी, कामगार बेरोजगारी ,महागाई खाजगीकरण ,भांडवलदारांना पाठबळ ,याविषयी घेतलेले चुकीचे निर्णय उघडकीस आणून , घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करतील देशात लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही ची सुरुवात होण्याचे हे लक्षण आहे .केंद्र सरकार ने ताबडतोब राहुल गांधी यांच्या खासदारकी विषयी घेतलेला निर्णय हा रद्द करावा अन्यथा काँग्रेस पक्ष देशभरामध्ये रस्त्यावर उतरून जाब विचारेल असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष डॉ कैलास कदम यांनी पिंपरी येथे दिला आहे.

.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

6 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

17 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

18 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

18 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

18 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

18 hours ago