मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदेवाही:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दिनांक 25 मार्च रात्री साडेआठ वाजता सुमारास समर्थ मशनरीज अँड इलेक्ट्रॉनिकचे संचालक प्रकाश वासुदेव समर्थ हे दुकान बंद करून स्वताच्या दुचाकी वाहनाने (MH-34-BS-4451) घरी जात असताना प्रभाग क्रमांक १ येथील रस्त्यावर एक अनोळखी व व्यक्ती संशयास्पद उभा होता. समर्थ यांनी त्याला विचारना केली की तु ईथे काय करतो आहेस त्यानी उत्तर दिले की मी नागदेवते यांच्याकडे काही कामानिमित्त जातो आहे. नागदेवते हे प्रकाश समर्थ यांच्या घरा शेजारी राहतात. नंतर समर्थ तिथुन निघून समोर काही अंतर गेल्यानंतर तो अनोळखी व्यक्ती नी शिट्टी वाजवली शिट्टी वाजवताच रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या झाडाला तीन पदरी तार बांधून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तार घेऊन दुसरा अनोळखी व्यक्ती अंधारात खाली बसून होता. त्याला शिट्टीचा आवाज जाताच त्याने तार जोराने ताणून धरला त्यामुळे प्रकाश समर्थ यांच्या गळ्याला फास लागत असल्याने त्यांनी संयम सुचकतेनं मुंडकं वाकवुन गाडीला वाकवित काढण्याचा प्रयत्न केला. तरी परंतु थोडासा उजव्या गालावर तार घासल्याने घसाठा गेला. जिवाला कोणतीही मोठी हाणी झालीं नसुन जीव वाचला आहे. हा हल्ला जीव घेण्यासाठी केला होता. की पैशाची रक्कम लुटण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…