लोकशाहीचा मुडदा! राहुल गांधी शिक्षा प्रकरणी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले प्रश्न.

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षे प्रकरणी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यांनी लिखित स्वरूपात प्रसिद्ध केलेल्या बयानात या प्रकरणातील महत्वपूर्ण मुद्दे समोर आणले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांना ज्या “बदनामी” प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली, त्या प्रकरणातील काही बारीक तपशील तपासले तर हा सगळा कसा भोंदू प्रकार आहे हे लक्षात येईल. Devil lies in the details असं इंग्रजीत म्हणतात. तर मग चला काही तपशील तपासू.

✓ कर्नाटकात केलेल्या भाषणाबद्दल बदनामीचा दावा सुरतच्या कोर्टात दाखल का झाला?
✓ सदर फौजदारी खटला २०१९ मध्ये दाखल झाला. अशा वेळी प्राथमिक चौकशी करायची आणि नंतरच दावा दाखल करून घ्यायचा असा न्यायव्यवस्थेत संकेत आहे. पण तशी प्राथमिक चौकशी न करता तो दाखल करून घेण्यात आला.
✓ त्यावर राहुलचं स्टेटमेंट २०२१ साली नोंदविण्यात आलं. त्याने पुन्हा स्टेटमेंट द्यावं अशी विनंती अर्जदार पूर्णेश मोदी २०२२ साली करतो. तत्कालीन मुख्य दंडाधिकारी दवे ही विनंती फेटाळून लावतात.
✓ पूर्णेश मोदी हायकोर्टात जाऊन स्वतःच दाखल केलेल्या खटल्यावर स्थगिती आणतो.
✓ दरम्यान, दवे यांची बदली होते आणि त्यांच्या जागेवर वर्मा नावाचे गृहस्थ येतात. पूर्णेश मग स्वतःच आणलेली स्थगिती हायकोर्टाकडून स्वतःच उठवून घेतो.

पुढे काय घडलं ते आपण जाणतो. तरीही, पुन्हा एक अत्यंत महत्त्वाचा तपशील.

✓ पूर्णेशचं मूळ नाव पूर्णेश भूतवाला असं आहे. राहुलवर खटला दाखल करण्यापूर्वी तो चपळाईने सरकार दरबारी आपलं नाव “पूर्णेश मोदी” असं बदलून आला.
✓ मोदी आडनावाची बदनामी ही ओबीसी समाजाची बदनामी आहे असा गळा आता भाजपावाले काढतायत. इतकं प्रेम आहे तर ओबीसींच्या जनगणनेला विरोध का करतात? शिवाय मोदी आडनाव राजस्थान मध्ये आहे, पारशी समाजात आहे. किंबहुना, स्वातंत्र्योत्तर काळात आडनावांची इतकी सरमिसळ झाली की कुठल्याही आडनावावरून कुणाची जात ध्वनित होत नाही.

भारताच्या इतिहासात अशा गुन्ह्याला (?) इतकी मोठी शिक्षा झालेली नाही. राहुलने तमाम मोदी आडनावाच्या लोकांना चोर म्हटलेलं नाही की गलिच्छ शिव्या दिल्या नाहीत. पण खिंडीत पकडले गेले की लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं यात त्यांची हातोटी आहे. मग त्यात लोकशाहीचा मुडदा पडला तरी बिघडत नाही.

असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हटले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

17 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago