नाशिक: दोन वर्षापासून पोलिसांनकडे बिल थकीत असल्यामुळे ठेकेदाराचा स्वातंत्र दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यातच आत्मदहनाचा प्रयत्न.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक,दि.15:-
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून स्वतंत्र दिनाच्या दिवशी एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. आज शासकीय कार्यालयात सर्वत्र ध्वजारोहण करण्यात आले. त्यात मालेगाव येथे पण ध्वजारोहण सुरू असताना सर्वाना थरकाप उडवणारा प्रसंग घडला. त्यामुळे ध्वजारोहण करिता आलेल्या नागरिक, अधिकाऱ्यांसह सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पोलिसांनी समय सूचकता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये पोलीस परेड ग्राउंडवर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच पेशाने ठेकेदार असलेल्या राजू मोरे याने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या नागरिकांच्या व पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी समय सूचकता दाखवत आत्मदहनाचा प्रयत्न विफल केला. या प्रकाराने कॉलेज मैदानावर काही काळ थरकाप उडाला होता.

मालेगाव येथे करोना महामारीच्या जीवघेण्या काळात बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांच्या जेवणासह संपूर्ण शहरात मंडप, लाईट ध्वनीक्षेपक, पाणी, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा पुरविण्याचा ठेका राजू मोरे, सुनील मगनराव मोरे यांना देण्यात आला होता. या सुविधांसाठी मोरे यांनी 93 लाख 95 हजार 547 रुपयांचे बिल त्यांनी जमा केले होते.

परंतु आपले थकीत बिल अनेक वेळा मागूनही त्यांच्या पदरी बिल काही पडत नव्हते. अशातच कुटुंब कस चालवायचं, घरखर्च कसा करायचा या विवंचनेत असताना नैराश्यात गेले. आज सकाळी स्वातंत्र्यदिनानिमित्त कॉलेज मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. करोना संकटात पुरविलेल्या सुविधांचे पैसे आपल्याला दिले जात नाही. दोन वर्ष उलटल्याने विविध आर्थिक अडचणी आपल्यासमोर उभ्या टाकल्या आहेत. शासनाकडे निधी आला आहे. परंतु तो मला दिला जात नाही. त्यामुळेच आत्मदहन करून स्वतःचा जीव संपविण्याचा प्रयत्न आपण केल्याचे मोरे यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, करोना व्हायरसच्या महामरीच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या सुविधा तसेच पोलिसांना जेवण पुरविण्याचे काम मोरे यांनी केले होते. या सर्व कामाचे 93 लाख 95 हजार 547 रुपयाचे बिल झाले होते. मात्र दोन वर्ष उलटले व करोना नियंत्रणात येऊन सुद्धा मोरे यांना बिल देण्यात आले नाही. ठेक्याचे बिल मिळत नसल्याने विविध आर्थिक अडचणींना मोरे यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे थकीत बिल मिळावे यासाठी ते सातत्याने अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते. थकीत बिल अदा केले जात नसल्याने मागणी करून वैतागलेल्या ठेकेदाराने आज ध्वजारोहण प्रसंगी कॉलेज मैदानावर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

14 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago