मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका येतील अतिदुर्गम व आदिवासी बहुल भागातील सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था राजारामच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत आंतरभारती शिक्षण संशोधन सेंट्रल इंडिया व न्यू जर्नी नवी दिल्लीच्या संयुक्त विद्यमाने घेऊन नुकतेच संस्थेचे अध्यक्ष अँड . एच. के.आकदर यांना इंडियन इस्लामिक कल्चर सेंटर लोधी रोड न्यू दिल्ली येथे सन्मान चिन्ह देऊन संस्थेला गौरविण्यात आले आहे.
राजाराम येथील सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेने सामाजिक वसा जपत शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबविणे, गोरगरीब मुलामुलींना मार्गदर्शन करून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शहरी भागाशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, वृद्ध व अनाथांना मदत करणे, वैवाहिक जीवनात मतभेद असणाऱ्या जोडप्यांना सुखी कुटुंबासाठी समुपदेशन करणे, उपेक्षितांना न्याय मिळवून देन्याचा प्रयत्न करणे, जनसामान्यांच्या कामात मदत करणे असे विविध उपक्रम राबविले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. एच के आकदार यांनी सामाजिक संकल्पनेतून निर्माण केलेल्या संस्थेची दखल घेऊन नॅशनल बलिदान अवार्ड व बाबा आमटे ग्लोबल अवॉर्ड पुरस्कार अशा दुहेरी पुरस्कार देऊन तालुक्यातील ग्रामीण भागाची दखल दिल्ली दरबारी पुरस्कार देऊन घेण्यात आली.
या वेळी संस्थेचे सचिव सौ, सुरक्षाताई आकदर, मनोज आकदर, भास्कर दुर्गे, शिवकुमार मधुकर गोंगले,संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यापुढेही असेच समाज हितकारक उपक्रम राबविण्याचे चालू ठेवण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…