सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम, दि.२८:- केंद्रीय प्रशिक्षण संचालनालय,नवी दिल्ली यांच्याकडून ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा व त्यांचा तांत्रिकटृष्टया सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन वाशिमअंतर्गत सामुदाय विकास योजनेच्यावतीने केकतउमरा येथे २४ मार्च रोजी एकदिवसीय मोफत दुरूस्ती शिबीर घेण्यात आले.
या दुरुस्ती शिबिरात दुचाकी वाहन, गँस शेगडी, विद्युत उपकरण दुरुस्ती, लाइट फिटीग व मिक्सर कुकर, इत्यादी दुरुस्ती करण्यात आली. एकुण लाभार्थी संख्या ४० टु व्हीलर रिपेअर, ३५ शिलाई मशिन, ३६ गॅस शेगडी, कुकर मिक्सर, ३० विद्युत उपकरण, मोबाईल रिपेअरींग दुरुस्ती या प्रकारे ग्रामस्थांनी शिबीराचा लाभ घेवून उत्तम प्रतिसाद दिला.
उद्धघाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. बा. ग गवलवाड होते. प्रमुख पाहणे केकतउमरा येथील जिल्हा परिषद
मुख्याध्यापक राम वाणी, अंतर्गत समन्वयक (सी.डी.टी.पी.योजना) एल. के लोणकर, केकत उमरा येथील उपसरपंच नागेश वाठ, पंचायत समिती सदस्य श्री.पुंड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते. शिबीराच्या आयोजनाकरीता एम. सी सावके, सीडीटीपी योजनेचे कर्मचारी व प्रशिक्षक जी.बी सावके, एस.पी मोहोकार, जी.डी तडस व प्रशिक्षणार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…