सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- अयोध्यात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांचे भव्य मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मंदिरासाठी चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकडाचा उपयोग केला जाणार आहे. बुधवार, 29 मार्चला बल्लारपूर येथून पवित्र सागवान काष्ठाची भव्य शोभायात्रा चंद्रपूर येथे येणार आहे. या शोभयात्रेत रामायण धारावाहिकेत प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, माता सिताची भूमिका करणारी दीपिका व लक्ष्मणाच्या भूमिकेला मूर्तरूप देणारे सुनील लहरी यांची उपस्थिती राहणार आहे.
विशेष म्हणजे, शोभयात्रेनंतर बुधवारी रात्री 9 वाजता चांदा क्लब ग्राउंड येथे काष्ठ पूजन व शोभायात्रा समितीचे अध्यक्ष राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या भक्तीगीतात तल्लीन होऊन प्रभू श्रीरामाची आराधना केली जाईल. चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे. ही शोभायात्रा दोन भागात होणार असून, 29 मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी 3.30 वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायंकाळी 4 वाजता पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचिन वृक्ष आहेत. त्यांचा घेर देशातच नव्हे, तर बहुदा आशियातील सर्व वृक्षात सर्वात मोठा आहे. या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल.
ही शोभायात्रा सायंकाळी 6 वाजता संपेल आणि त्याचवेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्री 9 पर्यंत चालेल. शोभायात्रेत पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्ग रंगोळ्यांनी सजविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गुढ्या तोरणे उभारण्यात येणार आहेत. शोभायात्रेनंतर रात्री 10 ते 12 या वेळेत कैलास खेर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी योगगुरू स्वामी रामदेव बाबा तसेच सद्गरु जग्गी वासुदेव आणि श्री श्री रवीशंकर यांनाही निमंत्रित केले आहे. काष्ठ पूजन सोहोळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून, एक कोटी श्रीरामनाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे सर्व नागरिकांनी साक्षीदार व्हावे, काष्ठ पूजनात सहभाग घेऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीत आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर येथील शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहारी सादरीकरण करण्यात येणार आहे. एकूण 43 प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्यात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून 1100 असे एकूण 2100 कलाकार हे सादरीकरण करणार आहेत. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित विविध सादरीकरणे भारतभरातून विविध प्रांतातून आलेले कलाकार करणार आहेत. या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा ‘नारीशक्ती-साडतीन शक्तीपिठे’ हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही सहभागी होणार आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…