गुन्हे शाखायुनिट२ ची धडाकेबाज कामगिरी..दुचाकी चोरटयांना अटक वाहनचोरीचे २१ गुन्हे उघड सहा लाख रुपये किंमतीच्या २५ मोटर सायकली जप्त…

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे:- पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनचोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते… गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी वाहनचोरीचे वाहनचोरीचे गुन्हयांचा बारकाईने अभ्यास करुन विशेष योजना तयार केली. युनिट २ चे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून वाहनचोरी गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोलीस नाईक १९२३ आतिष कुडके व पोलीस कॉस्टेबल १९३१ शिवाजी मुंडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि टाटा मोटर्स या ठिकाणी काही दिवसापुर्वी हेल्पर म्हणुन कामाला असलेल्या एका कामगाराच्या हालचाली संशयास्पद असुन त्याचेकडे असलेली मोटर सायकल चोरीची असण्याची शक्यता आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदर संशयिताची टाटा मोटर्स मधुन माहीती घेतली असता तो कामावर येत नसल्याचे दिसुन आले त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून घेवून तांत्रीक तपास केला. टाटा मोटर्स परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. काही वाहनांना जीसीएस सिस्टीम बसवुन सापळा लावुन निगराणी ठेवली. तांत्रीक तपासामध्ये संशयित इसम हा साधारण प्रत्येक चार दिवसांनी परळी जिल्हा बिड येथे येत-जात असल्याचे दिसुन आले. त्याचेवरील संशय वाढल्याने वरीष्ठांचे परवानगीने गुन्हे शाखा युनिट २ चे पथक लागलीच परळी जिल्हा बिड येथे पाठवून शोध घेवून इसम नामे प्रदीप आश्रवा गायकवाड वय २५ रा. मोहा ता. परळी (बैजनाथ) जिल्हा बिड याला सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे कब्जात चोरीची मोटर सायकल मिळुन आली म्हणुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने टाटा मोटर्स येथून सुरवातीला एक मोटर सायकल चोरुन परळी येथील त्याचा साथीदार इरफान शेख याला विक्री केली त्यातून चांगले पैसे मिळालेने व त्याला दारूचे व्यसन असल्याने टाटा मोटर्स येथून वारंवार वाहनचोरीचे गुन्हे करु लागला. दहा ते बारा मोटर सायकल चोरीला गेल्याने टाटा मोटर्स येथील सिक्युरिटी वाढविल्यामुळे तो पिंपरी चिंचवड शहरात इतर ठिकाणी मोटर सायकलची चोरी करू लागला. चोरीची वाहने घेणारा त्याचा साथीदार इरफान महेबुब शेख वय १९ रा. उड्डानपुलाखाली गौमतनगर परळी जि. बिड याला मोटर सायकली विकल्याची माहीती दिल्याने इरफान शेख याला अटक करुन नमुद दोन्ही आरोपींचेकडे केलेल्या तपासामध्ये एकूण २१ मोटर सायकल वाहने जप्त करण्यात आली.

वाहनचोरीचे तपासामध्ये पोलीस हवालदार १०२३ जमीर तांबोळी, पोलीस नाईक १९२४ नामदेव कापसे यांना मिळाले गोपनिय माहीतीवरून इसम नामे आकाश अनिल घोडके वय २१ वर्षे धंदा- मजुरी रा. भिमक्रांतीनगर पत्राशेड आझाद चौक निगडी यास पेट्रोलिंग मुदतीत ताब्यात घेवून ४ मोटर सायकल वाहने व एक महागडी सायकल जप्त करण्यात आली. तपासामध्ये एक मोटर सायकल स्क्रॅप केल्याचे निष्पन्न झाल्याने भंगार दुकानाचा मालक अमजद जाफर खान रा. हर्षदा हौसिंग सोसायटी लिंकरोड, चिंचवड पुणे यास अटक करण्यात आली.

वाहनचोरीचे तपासामध्ये सुमारे ६ लाख किंमतीच्या एकूण २५ मोटर सायकली जप्त करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत-

१) चिखली ८४/२३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ डी ०८६
२) पिंपरी २८३/२३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ एफई १४११
३) चिखली ६३५/२२ भादवि कलम ३७९ मधील एम एच १९ वी आर १६४५
४) पिंपरी २२५/२३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ जीई ८७८०
५) निगडी १३१/२३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ जीके ३३५०
६) चिखली ६४९/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच ०९ ईसी ८१२६
(७) पिंपरी २९० / २३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १० सीसी १३०७
८) चिखली ३४/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ ईए ६८८७
९) चिली १११/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ नीचाय ८२९८
१०) चिखली ६१५/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच २४ एफएन ०१०३
(११) चिखली १२/१३ भादवि कलम ३५९ मधील एमएच २५ वाय ०८३७
१२) निगडी ८६४/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ डीडन्तु १९०३
१३) चिखली ६६६/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच २१ बीवम १६१५
१४) पिंपरी २८९/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ जीई १०१२
१५) चिखली ३४५/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४बीएस ३२५०
१६) वाकड ४९/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच ४ईएन ७४१३
१७) निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२०२३ भादवि कलम ३७९
१८) निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ८६० / २०२२ भादवि कलम ३७९ सायकल
१९) पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १६/ २०२२ भादवि कलम ३७९ एमए१४८०
२०) तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११४ / २०२३ भादवि कलम ३७९ एम एच १४ईटी
२१) निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २५० / २०२३ भादवि कलम ३७१ एम एच १४ बीज

वरील प्रमाणे वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असुन वाहनचोरी गुन्हयांचे तपासामध्ये असे निदर्शनास आले आहे कि, आरोपी प्रदीप आश्रवा गायकवाड वय २५ रा. मोहा ता. परळी (बैजनाथ) जिल्हा बिड हा हॅन्डल लॉक नसलेल्या सहजासहजी ड्युप्लीकेट किल्ली लागेल अशा मोटर सायकली टार्गेट करुन चोरी करायचा व त्याचा साथीदार इरफान महेबुब शेख वय १९ रा. उड्डानपुलाखाली गौमतनगर परळी जि. बिड याला विक्री करणेसाठी देत होता. इरफान शेख हा फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते न भरलेल्या जप्त करण्यात आलेल्या गाडया असल्याचे सांगुन परळी जिल्हा बिड परिसरातील मजुरीची कामे करणा-या गरीब गरजु लोकांना खोटे सांगुन विक्री करायचा असे निदर्शनास आले आहे. तरी नागरिकांना पोलीसांचेवतीने असे आवाहन करण्यात येते कि, वाहनाची कागदपत्रे पाहून व कायदेशीर गोष्टींची पुर्तता करुन जुनी वाहने खरेदी कराची तसेच मोटर सायकल मालकांनी मोटर सायकलचे हॅन्डल लॉक करुन वाहन पार्कंगचे ठिकाणी पार्किंग करावे व शक्य झाल्यास जीपीएस सिस्टीम सारखी सिक्युरीटी सिस्टीम बसवावी.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सह पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस आयुक्त श्री निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार केराप्या माने, शिवानंद स्वामी, दिपक खरात, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, उषा दळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिष कुडके, सागर अवसरे, नामदेव कापसे, शिवाजी मुंढे, अजित सानप, संदेश देशमुख, उध्दव खेडकर यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

8 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

19 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

20 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

20 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

20 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

20 hours ago