समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व टीम ची धडाकेबाज कामगिरी..भरदिवसा व्यापा-यास द्रृश्यम स्टाईलने लुटणा-या मास्टरमाइंड यास समर्थ पोलीसांनी केले गजाआड २५ लाख रुपये जप्त

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

समर्थ पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे:- समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीत दिनांक २३/०३/२३ रोजी सकाळी ११.३० या दरम्यान दोन इसमांनी कोयत्याचा धाक दाखवुन एक व्यापा-याचे ४७ लाख रुपये लुटल्यामुळे समर्थ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३९४, ३४१.३४ महाराष्ट्र अधिनियम कलम ३७(१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार सहा. पोलीस आयुक्त सतिष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली समर्थ तपास पथकाने तात्काळ तपास सुरु केला.

यातील फिर्यादी मंगलपुरी भिकमपुरी गोस्वामी वय ५५ रा. सिटी सर्व्हे नं २०८ मंगळवार पेठ हे पन्ना मार्केटिंग एजन्सी पिंपरी चौक येथे मागील ३० वर्षापासून कामास होते. फिर्यादी हे पन्ना एजेन्सीमध्ये जमा होणारी रोख रक्कम दररोज सकाळी ११.०० वा. ते १२.०० वा. चे सुमारास बँक ऑफ इंडिया, शाखा रास्ता पेठ, पुणे येथे भरण्यासाठी जातात, दिनांक २३/०३/२०२३ रोजी ११.३० वा. चे सुमारास फिर्यादी है नेहमीप्रमाणे ४७ लाखाची रोख रक्कम ही स्कुटर वरुन जात असताना आझाद चौक येथे आले असता मोटार सायकलवरुन दोन आरोपी यांनी येवुन कोयत्याचा धाक दाखवुन फिर्यादी यांचेकडील ४७ लाख रुपये जबरदस्तीने लुटुन घेवुन पळून गेले होते.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. सहा. पोलीस आयुक्त सतिश गोवेकर फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनखाली समर्थ, फरासखाना, डेक्कन, विश्रामबाग, शिवाजीनगर या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील व पळुन गेलेले दिशेचे जवळ जवळ पुर्ण पुणे शहरातील ५०० च्या वर सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता आरोपी हे गहुंजे गाव, पिपरी चिंचवड या परीसरात पळुन गेल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर आरोपी यांनी वापरलेले अॅक्टीव्हा स्कुटरचा शोध घेणेकामी आर.टी.ओ पुणे येथुन पुणे शहर व आसपासच्या भागातील स्कुटरची माहिती कावुन त्याचा शोध घेवुन माहिती घेण्यात आली होती. परंतु आरोपी यांनी गुन्हा करताना सर्व प्रकारची योग्य ती काळजी घेतलेली असल्याने आरोपी हे निष्पन्न होत नव्हते. त्यानंतर गुन्हा करण्यापुर्वी आरोपी हे कोणत्या दिशेने आले याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता, एक संशयीत रिक्षा सदर त्याठिकाणी फिरतांना आढळुन आली. त्या एका फुटेजचा आधार घेवुन सपोनि प्रसाद लोणारे व त्यांच्या पथकाने रिक्षाची माहीती मिळवून सदर रिक्षा चालकास ताब्यात घेतले व सदरचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील वापरलेली स्कुटर चालविणाऱ्या आरोपीचे नाव १) किरण अशोक पवार राह. अप्पर, एम. आय. टी. कॉलेजजवळ, बिबवेवाडी, पुणे व पाठीमागे बसलेला २) आकाश कपील गोरड रा. अप्पर बिबवेवाडी सध्या सोमाटणे हे दोघे असल्याचे निष्पन्न केले. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत व त्याचे सोबत तिसरा व्यक्ती जो रिक्षामध्ये दिसत होता त्याचेबाबत तपास केला असता तिसरा व्यक्ती हा आरोपीचा मित्र नामे ३) ऋषीकेश गायकवाड रा. बी-३७/०१, इंदिरानगर, अप्पर, व्ही.आय.टी कॉलेजजवळ, बिबवेवाडी, पुणे ३७ हा असल्याचे निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेण्यात आले.

ऋषीकेश गायकवाड याचेकडे सखोल तपास केला असता गायकवाड हा सन २०१९ पासुन पन्ना एजन्सीमध्ये गॉरड के फिलीप्स इंडिया लि. या कंपनी मार्फत पन्ना एजन्सीकडे सिगरेट विक्री करणेकरीता सेल्समन म्हणुन काम करीत होतो. आरोपी गायकवाड याने भांडण केल्यामुळे त्यास ऑक्टोबर २०२२ मध्ये कामावरुन काढले होते. ऋषीकेश गायकवाड यास पन्ना एजन्सी मध्ये नोकरीस असल्याने त्याला पन्ना एजन्सी मध्ये दररोज २० ते २५ लाखापेक्षा जास्त रोख रक्कम ही फिर्यादी भरण्यास जातो व त्याचा बँकेतू जाण्याचा वेळ माहिती होती. त्यानंतर ऋषीकेश गायकवाड याने किरण पवार व आकाश गोरड याचे मदतीने दुश्यम फिल्म स्टाईलने पैसे लुटण्याचा प्लॅन केला. या आरोपी यांनी सदर भागाची माहीती घेवुन चार दिवस रेकी केली व पळून जाण्यासाठी कॅमेरे नसलेले रोडही पाहुन ठेवले होते.

दिनांक २२/०३/२०२३ रोजी गुढीपाडवा असल्याने बँका बंद असतात. त्यामुळे दिनांक २३/०३/२०२३ रोजी दोन दिवसाची मोठी रक्कम लुटण्याचा प्लॅन करुन दिनांक २३/०३/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. पन्ना एजन्सी जवळ रिक्षामध्ये येवुन किरण पवार व आकाश गोरड यांना पैसे घेवुन जाणारे व्यक्तीस दाखविला व आरोपी ऋषिकेश गायकवाड हा रिक्षा घेवुन परत घरी निघुन गेला व स्वताच्या घरात असलेल्या कॅमेरेखाली दिवसभर बसुन राहीला…

मास्टरमाइंड ऋषीकेश गायकवाड यांचेकडुन तपासामध्ये आतापर्यत २५ लाखाची रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली अॅक्टिव्हा स्कुटर ही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी ऋषीकेश गायकवाड याने सदर गुन्हयाचे प्लॅन करुन त्याचा मित्र किरण अशोक पवार व आकाश कपील गोरड याचे सोबत द्रुश्यम स्टीईनले सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. उर्वरीत दोन्ही आरोपींचा शोध चालु आहे.

सदर गुन्हयाचा तपास वपोनि / रमेश साठे हे करीत आहे.

सदरची कामगिरी ही मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग. मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ पुणे शहर, मा. श्री. सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रमेश साठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. श्री प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक / प्रसाद लोणारे, पोउनि सौरभ माने, पोउनि सुनिल रणदिवे, पोउनि मिरा त्रंबके, पोउनि सौरभ थोरवे, पोउनि दिपक यादव, सपोनि राकेश जाधव, पोउनि निलेश मोकाशी, पोउनि राकेश सरडे, सपोनि भोलेनाथ अहीवळे, पोलीस अंमलदार सपोफी/ दत्तात्रय भोसले, पोहवा / गणेश वायकर, पोना / रहिम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, मंगेश जाधव, शरद घोरपडे, पोअं/ज्ञानेश्वर सुर्यवंशी, पोअं/ रिकी भिसे, मपोअं/ निलम कर्पे, पोअं/ जितु पवार, मपोअं/ प्रियंका खेडेकर, मपोअं/योगिता आफळे, पोअं/ कुडाळकर, पोना / प्रविण पासलकर, पोना/ वैभव स्वामी, पोना/ मयुर भोसले, पोअं/ संदिप पवार, पोहवा / शरद गायकवाड, पोअं/ संदिप तळेकर, सागर घाडगे, मयुर भोसले, आशीष खरात, अर्जुन थोरात, बशीर सैयद, रणजित फडतरे, सचिन गायकवाड यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

11 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

22 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

22 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

22 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

23 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

23 hours ago