संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 29 मार्च:- राजुरा नगरपरिषद तर्फे स्वच्छोत्सव 2023 दिनांक 7 मार्च 2023 ते 30 मार्च 2023 या कालावधीत महिलांच्या स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिगत करण्यासाठी स्वछोतसव 2023 अभियान राबविण्यात आले. राजुरा नगरपरिषद क्षेत्रात स्वच्छतेच्या संदेश व जनजागृती प्रभातफेरीचे दिनांक 29 मार्च 2023 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरुवात झाली. शहराच्या मुख्य रस्त्यांनी उईके चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक, राम मंदिर व नंतर नगरपरिषद कार्यालयात प्रभातफेरीचा समारोप करण्यात आला.
त्यानंतर नगरपरिषद प्रांगणावर कुमारी सुरेखा पटेल प्रकल्प अधिकारी यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले, व सर्वांकडून स्वच्छतेच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शेवटी राष्ट्रगीत घेऊन व सर्वांचे आभार मानून रॅलीची सांगता झाली. ह्या रॅलीत प्रामुख्याने राजुरा शहरातील महिला बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅलीत सहभाग घेतला तसेच आदर्श हायस्कूलचे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी यांनी सुद्धा रॅलीत उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
त्याचप्रमाणे माझे शहर साफ असो त्यात सर्वांचा हात असो, असा एका चिमुकलीचा आर्त हाक होता ह्या संदेशाकडे रॅलीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, तसेच या कार्यक्रमात सखी मंच राजुराचे पदाधिकारी यांनी सुद्धा सहभाग नोंदविला व DAY NULM च्या CRP व दर्पण शहर स्तर संघ राजुरा यांचे अथक परिश्रम लाभले आहे, तसेच न,प, कडून सर्व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,
ह्या रॅलीला यशस्वी करणे करिता विजय जांभुळकर प्रशासकीय अधिकारी, संकेत नंदवनची पाणीपुरवठा अभियंता, सुरेखा पटेल प्रकल्प अधिकारी, प्रांजली सरपटवार समूह संघटक, आदित्य खापणे विद्युत अभियंता, उपेंद्र धामणगे करनिरीक्षक, अक्षय सूर्यवंशी मिळकत व्यवस्थापक ,अश्विन कुमार भोई लेखापाल, संजय जोशी लिपिक, वीरेंद्र धोटे Trust,बादल बेले, राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख व आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…