गुन्हे शाखा युनिट-1 ची कामगिरी पुण्यात भारी.. व्यापा-याची रोकड लुटणारे मुख्य दोन सराईत गुन्हेगारस् केले जेरबंद.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २३/०३/२०२३ रोजी सकाळी ११/३० वा थे सुमा पन्ना एजन्सी नानापेठ, पुणे या सिगारेट व बडीशेपचे डिलरशिप असलेल्या दुकानातील मालाचे विक्रीतील रोख रक्कम दुकानातील कामगार मागे मंगलपुरी मिकगपुरी गोस्वामी, वय ५५ वर्ष रा मंगळवारपेठ, पुणे हे बँकेत भरण्यास त्यांचेकडील अॅक्टीव्हा स्कुटरने जात असताना पाठीमागून आलेल्या गॉगल घातलेला, तोडास मास्क, डोक्यास टोपी लावलेल्या २० ते २५ वर्ष वयाचे दोन इसमांनी त्यांचे मागून काळे रंगाचे मोपेडवरून येवून फिर्यादी यांचे गाडीस मागून धक्का देवून तुला गाडी निट चालवीता येत नाही का ? असे म्हणुन त्यांचा रस्ता आडवून दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांचेकडील रोख ४७,२६,०००/- रू व १४ चेक असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती सदरबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून समर्थ पोलीस ठाणे येथे गु र नं. ७५/२०२३ भादवि कलम ३९४.३४१.३४ महा पोलीस अॅक्ट ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरवस्तीमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यामुळे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केले होते. आरोपींनी वापरलेल्या काळे रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क, डोक्यास टोपी, डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख पटविणे व त्यांचा छडा लावणे हे पोलीस समोर एक आव्हान होते.

गुन्हे शाखा १ चे सहा पोलीस आयुक्त श्री सुनिल पवार तसेच युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तसेच युनिट १ कडील पथक असे दाखल गुन्ह्याचा समर्थ पोलीस ठाणेसह समातर तपास करीत असताना गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून पुणे शहरातील बाणेर, हिंजवडी, गहुंजे असे ठिक ठिकाणचे एकूण २०० ते २५० सी सी टी व्ही फुटेज आहोरात्र चेक करण्यात आले तसेच मा सहा पोलीस आयुक्त श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली तांत्रीकबाबींची मदत घेवून दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना दिनांक २८/०३/२०२३ रोजी सायंकाळी सपोफौज राहुल मखरे व पो शि दत्ता सोनवणे याना गुप्त बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की दाखल गुन्हा हा किरण पवार व त्याचा साथीदार नामे आकाश गोरड यानी केला असून किरण पवार हा वाघोली परिसरात लपुन बसला असून त्याचा साथीदार आकाश गोरड हा पवना डॅम कोथुरणेगाव येथे पळून गेला असून त्यांचेकडे लुटलेली रक्कम आहे. अशी खात्रीशीर बातमीप्राप्त झाल्याने लागलीच गुन्हे शाखा युनिट १ कडील अधिकारी व अमलदार यांची दोन पथके तयार करून दिनांक २८/०३/२०२३ रोजी रात्रीच वाघोली व पवना डॅम, कोथुरणे, ता मावळ, जि पुणे येथे रवाना करण्यात आले होते.

आरोपींबाबत काहीएक मागोवा नसताना त्यांचा रात्रभर शोध घेत सदर ठिकाणी रहाणारे रहिवाशी यांचेकडे कौशल्यापुर्ण चौकशी करून दिनांक २९/०३/२०२३ रोजी संशयावरून आरोपी नामे आकाश कपिल गोरड वय २१ वर्ष रा बी/३७, रूम नं २ अप्पर बिबवेवाडी, व्हिआयटी कॉलेजजवळ, पुणे. यास पवणा डॅम कोथुरणे गाव, ता मावळ जि पुणे येथून ताब्यात घेतले असता आरोपीने स्वताचे नाव खोटे सांगीतले तसेच केस बारीक करून स्वताची ओळख लपवीण्याचा प्रयत्न केला परंतू त्याचेकडे कसून चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याचेकडून लुटलेल्या रकमेतील रोख १,००,०००/- रू जप्त करण्यात आले आहेत. तसेच मिळालेल्या बातमीच्या आधारे ताब्यातील आरोपीचा साथीदार नामे किरण अशोक पवार वय २५ वर्ष रा बी / २४ / ११, अप्पर बिबवेवाडी, व्हिआयटी कॉलेजसमोर, पुणे. यास वाघेश्वर मंदीर वाघोली, जि पुणे येथून ताब्यात घेवून त्याचेकडून लुटलेल्या रकमेतील रोख ४,००,०००/- रू असे एकुण ५,००,०००/- रूपये जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचे विरूध्द भारतीविद्यापीठ, बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईकामी समर्थ पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक – सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री सुनिल पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस उप- निरीक्षक सुनिल कुलकर्णी. पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, शुभम देसाई. राहुल मखरे, अमिनद लडकत, निलेश साबळे, महेश बामगुडे, आय्याज दडीकर, विठ्ठल साळुंखे, अनिकेत बाबर शशीकांत दरेकर यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

नागपूर: अभाविपच्या 53 वे प्रांत अधिवेशनाची तयारी उत्साहात, समाजातील प्रत्येक घटकांकडून लघु निधी संकलन.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53…

4 hours ago

हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) ठरणार विदर्भातील पहिले ‘सौरग्राम’

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘केल्याने होत आहे रे…

4 hours ago

सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा देताच, अकोला सर्वोपचार रुग्णालय प्रशासन नरमले.

अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शासकिय वैद्यकीय…

5 hours ago

रेड स्वस्तिक सोसायटीचा 12 जानेवारीला 24 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे नागपूर येथे आयोजन.

प्रसिद्ध सिने कलावंत सयाजी शिंदे सह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होणार कार्यक्रम संपन्न. पल्लवी मेश्राम उपसंपादक…

6 hours ago

गोंडवाना विद्यापीठात ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रास मंजूरी.

अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांचा प्रस्ताव अधिसभेत मंजूर. संतोष मेश्राम, राजुरा तालुका…

6 hours ago