✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीची मशीन गेल्या दीड ते दोन वर्षांपासून डॉक्टर नसल्यामुळे बंद आहे या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. चाचरकर यांचेशी रुग्णमित्र गजु भाऊ कुबडे यांनी वारंवार चर्चा निवेदन दिली स्वत तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केले असता तात्पुरती व्यवस्था करण्यात आले होती परंतु परत मशीन बंद असल्याने गर्भवती महिलांना सोनोग्राफी ही खाजगी रुग्णालयात जाऊन करावी लागते यामुळे हिंगणघाट शहरातील व परिसरातील गरजू रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन मात्र धूळ खात आहे ही बाब हिंगणघाट येथील तहसीलदार सतीश मसाळ यांच्या निदर्शनात आणून दिली असता तहसीलदार मसाळ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक तडस यांचेशी फोन वर चर्चा करून लवकरच हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील बंद असलेली सोनोग्राफी मशीन लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन लवरकर सुरू करून हिंगणघाट तालुक्यातील नागरिकाना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली. यावेळी गजू कुबडे, प्रविण उपासे, उमेश नेवारे, दशरथ ढोकपांडेसह शहरातील शेकडो नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…