पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २९/ ०३ / २०२३ रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रदीप दिनकर देवकर व जखमी शुभम कृष्णाराव भोडे हे वैभव थिएटर जवळ ३२ नंबर हडपसर पुणे येथे चहाचे टपरीवर सिगारेट ओढण्यासाठी जावून परत रिक्षाने, सरकारी ३२ नंबर शाळा हडपसर पुणे येथे जवळ आल्यावर रिक्षा समोर दोन टू व्हीलरवर डबल सीट वर सागर घायतडक, ओम ऊर्फ पिंटू भंडारी, राजन लावंड, मेघराज शितोळे हे आले. त्यांनी त्यांच्या हातामध्ये धारधार शस्त्र घेवून, येवून त्यांनी अनिकेत घायतडकचा झालेल्या खुनाचा राग मनामध्ये धरून आम्हाला रिक्षाच्या बाहेर ओढुन काढले. त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शुभम मॉडेला त्यांनी त्यांच्याजवळील धारधार शस्त्राने मारहाण करुन आपआपले टुव्हिलर गाड्यांवर तेथून निघून गेले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशनला गु.र.नं ३९५ / २०२३ भादंवि कलम ३०७, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४, सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१), (३) सह १३५ प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हडपसर पोलीस ठाणेकडील तपासपचकातील अंमलदार पोशि प्रशांत दुधाळ यांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती घेवून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंढवा ब्रिज येथे सापळा रचून आरोपी नामे १) पिंटू विनोद भंडारी वय २१ वर्ष रा. सर्वे नंबर १६५ काळुबाई मंदिराजवळ माळवाडी हडपसर पुणे २) राजन रघुनाथ लावंड वय २१ वर्ष रा. सर्व नं १६५, यश हॉस्पीटल समोर माळवाडी हडपसर पुणे ३) ऋषीकेश प्रविण शितोळे वय १९ वर्ष रा. सर्वे नं १६५ हडपसर पुणे. ४) रोशन हनुमंत सोनकांबळे वय २९ रा. मांजरी फार्मजवळ, मांजरी पुणे यांना गुन्हा दाखल झाल्यापासून ४ तासाचे आत अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कणिक, मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळ सा वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे सो, पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे सी, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, समिर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार, प्रशात दुधाळ, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, अतुल पंधरकर भगवान हंबर्डे, अनिरुध्द सोनवणे, अजित मदने, रशिद शेख, मनोज सुरवसे, अमोल दणके यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…