सावनेर येथील गोमुख विद्यालयात ‘हर घर तिरंगा अभियान सप्ताहाचे आयोजन.

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -९८२२७२४१३६

सावनेर:- नांदागोमुख येथील गोमुख विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम व अमृत महोत्सवी सप्ताह दि.११ ऑगस्ट पासून साजरा केला जात आहे. या सप्ताहानिमित्त शाळेत राष्ट्रीय गीतगायन स्पर्धा, शाळा स्वच्छता अभियान, नशामुक्त भारत अभियान, अमृत महोत्सवी रक्षाबंधन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शाळेत निमंत्रित करून अमृत महोत्सवी रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यासोबतच १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत “हर घर झेंडा” हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्याकरीता विद्यार्थ्यांना झेंडे वितरित करण्यात आले असून १३ तारखेला मुख्याध्यापक अशोक डोंगरे यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. १४ ऑगस्ट ला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बंडू मिलमिले यांचे हस्ते तर १५ ऑगस्ट ला संस्थेचे अध्यक्ष प्रा. नेमराज मोवाडे यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले.१६ ऑगस्ट ला वृक्षारोपण करण्यात आले.व १७ ऑगस्ट ला १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना आरोग्य विभागाच्या मदतीने लसीकरण मोहीम राबवून सप्ताहाचा समारोप करण्यात येईल.

सप्ताह यशस्वीपणे राबविण्यासाठी मुख्याध्यापक अशोक डोंगरे, क्रीडा शिक्षक राजेंद्र चवडे, कला शिक्षक अमोल महाजन, संगीत शिक्षक शिरीष रंडखे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

2 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

2 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

3 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

3 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

4 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

4 hours ago