सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ, स्पोर्ट्स क्लब आणि कमांडो आर्मी पोलीस कँरिअर अकॅडमी, तालुका सोशल मीडिया यांचा संयुक्त कार्यक्रम
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं-९८२२७२४१३६
सावनेर : संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे, शासकीय संस्था सोबतच अनेक सामाजिक संस्था देखील या हर घर तिरंगा आयोजनाच्या जनजागृतीसाठी रॅली काढून योगदान देत आहेत.
14 ऑगस्ट 2022 रोजी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व स्पोर्ट्स क्लब, तायकांडो क्लब, कमांडो आर्मी पोलीस करिअर अकादमी, सामाजिक कार्यकर्ते बांधवांच्या उपस्थितीत गांधी पुतला चौकात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यास सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले, कार्याध्यक्ष दीपक कटारे, सचिव लक्ष्मीकांत दिवटे, उपाध्यक्ष नीलेश पटे, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक डोमसाव सावजी ,अँड्. शैलेश जैन आदींनी पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात केली.
हर घरी तिरंगा,भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष आणि सावनेर स्केटिंग अकादमीचे छोटे स्केटर पायी पदयात्रेचे आकर्षण ठरले. तर गांधी पुतळा, गडकरी चौक, बाजार चौक, होळी चौक, स्वातंत्रता संग्राम सेनानी पीलाजी करोकार चौक, मडकी चौक,पोलीस स्टेशन, अवधूत वाडी, राजकमल चौक, गांधी पुतळा इत्यादी मार्गभ्रमण करीत गांधी पुतळा येथे पदयात्रेचे समापन करण्यात आले. तर पदयात्रेत शामील सर्वांचे सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले यांनी आभार मानले. तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी या भव्य पदयात्रेत उपस्थित राहून सर्व सामाजिक संस्थांना प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी शिवसेनेचे वरिष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते उत्तम कापसे, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तेजसिंग सावजी, प्रा.योगेश पाटील, विनोद गुप्ता, प्रा.विजय टेकाडे, मधुकर रोकडे, पुरुषोत्तम नागपुरकर, पियुष झिंजुवाडिया, मुकेश् झरबडे,अनिल अडकिने. सामाजिक कार्यकर्ते दिलीप घटे.सुभाष मछले, व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार, दिलीप जैन, समीर घुगल, प्रदीप सार्वे, आकाश चरपे, तालुका सोशल मीडियाचे श्याम चव्हाण, सूरज सेलकर, शुभम ढवळे, स्पोर्ट्स क्लबचे मनोज बघरे, स्केटिंग अकादमीचे कुणाल बेळे, पी. घाटे, कमांडो आर्मी पोलीस अकादमीचे सुभाष ठाकूर, संदीप रहांगडाले, मयूर काळे, प्रवीण रहांगडाले, तुषार बोंडे, आदी साहित्य अकादमीचे प्रशिक्षणार्थी, स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…