प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज देश रक्षणासाठी दिवस रात्र उन्ह पाऊस झेलत जीवाची पर्वा न करता देशरक्षण करणाऱ्या सीआरपीएफ मध्ये उप निरीक्षक पदावर सेवारत असलेले वीर सैनिक अशोक थूल यांचा पेरा मिलिटरी मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सैनिक हेच राष्ट्राचे खरे हिरो असतात. ते निःस्वार्थपणे आपल्या देशाची सेवा करतात आणि आपल्या देशासाठी आणि देशवासियांसाठी त्याग करण्यास तयार असतात. सैनिकांचे जीवन कठीण आहे. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. सैनिक हे देशाचे अभिमान आहे. ते शिस्तप्रिय, धाडसी आणि निस्वार्थी आहेत. त्यांचे जीवन आव्हानांनी भरलेले आहे आणि ते प्रत्येक आव्हानाला त्यांच्या चेहऱ्यावर हसतमुखाने सामोरे जातात.
सीआरपीएफ मध्ये उप निरीक्षक पदावर सेवारत असलेले अशोक थूल दिनांक 31 मार्च ला 29 बटा. के.री.पू. बल विशाखापट्टणम इथून सेवानिवृत्त झाले. ते दिनांक 02 एप्रिल ला त्यांच्या राहते घरी आदर्श नगर, हिंगणघाट इथे पोहचले असता पेरा मिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट च्या वतीने त्यांच्या घरी जाऊन त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाला उपस्थित पेरा मिलिटरी मित्र परिवार तर्फे प्रभाकर पाटील, शमशेर बेग, विवेक भगत, रविन्द्र नौकरकर, सुनील दिवे, संजय कडू, भारत फुलकर, दिलिप चालखुरे, जानराव चांभारे, श्रीकांत फलके, पुरुषोत्तम उईके, देवानंद जंगले, अरुण भगत, प्रफुल्ल दरवरे, वसंता सुटे, कालिदास सातघरे, अरुण आत्राम, रमेश केवट, राजू गुजरकर, मिलिंद वैद्य, प्रवीण कुमरे, शंकर सहारे, भालचंद्र चौके, गजानन डेहाने इत्यादी नागरिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांनी त्यांच्या नवीन पारिवारिक जीवन सुखमय, समृध्द पुढील जीवनासाथी उज्वल आयुष्य करिता शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…