कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर:- शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचे पोस्टर समोर डॉल्बीच्या डी.जे च्या तालावर सिगरेटचा धूळ सोडत, नशापान करत मुली अश्लील डान्स करत असल्याचा व्हिडीओ मधून समोर आले आहे. हा प्रकार कोल्हापुर येथील असून यावर अनेकांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.
शिवाजी महाराज – शाहू महाराज यांच्या पोस्टर समोर अशोभनीय कार्य केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात या व्हायरल व्हिडीओप्रकरणी मुलींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक डीजे लावण्यात आल्याचं दिसून आलं आहे. या डीजेच्या स्पीकरवर पंचगंगा तालीम असं लिहिण्यात आलं. त्याच पोस्टरवर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू महाराज यांचा फोटो आहे. डीजेवर प्रसिद्ध चंद्रमुखी या गाण्याचं रिमिक्स सुरु आहे. मोठ्या प्रमाणात डीजेच्या स्पीकरसमोर गर्दी आहे. तरुण तरुणीच्या डीजेच्या तालावर थिरकत आहेत. अशातच काही मुली या चक्क सिगरेटचा धूळ सोडत अश्लील डान्स करत असल्याचे दिसून आले. तर काही तृतीयपंथीही तिथं उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. एक मिनिटं 19 सेकंदाचा हा व्हिडीओ असून कोल्हापूरमधील व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया ग्रूपवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
काय आहे ही घटना….
श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी जग म्हणून एक धार्मिक कार्यक्रम घेता जात असतो. हा एक तृतीयपंथीयांचा धार्मिक कार्यक्रम आहे. यावेळी मंडळांकडून तृतीयपंथीयांचं स्वागत केलं जातं. आधी वेगळ्या प्रकारे स्वागत तृतीयपंथीयांचं स्वागत केलं जात असे. त्यांचे पाय धुणे, त्यांचा सन्मान करणे, इत्यादी प्रकारे तृतीय पंथीयांचं स्वागत वेगवेगळ्या मंडळांकडून केलं जात असे. पण गेल्या काही वर्षात या सगळ्या गोष्टींपेक्षाही डीजे आणि धांगडधिंगा याला जास्त महत्त्व प्राप्त झालं. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचं चर्चा रंगली आहे.
खुलेआम धांगडधिंगा घालणे, सिगरेट ओढणे, नशाबाजी करणे आणि गोंधळ घालण्याच्या याप्रकाराविरोधात आता कोल्हापूरमध्येच नव्हे तर राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. शिवप्रेमी आणि शाहूप्रेमी यांनी या व्हायरल व्हिडीओनंतर संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणीही केली जातेय.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…