राज शिर्के मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शिक्षकांचे कर्तव्य असते मुलांना योग्य संस्कार शिकवणे पण शिक्षकच मुलावर अत्याचार करत असेल तर अशीच कांदिवली पश्चिम येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील रायम्स अँड रंबल या प्ले ग्रुपमध्ये दोन महिला शिक्षीकेने लहान मुलाला मारहाण करणे, उचलून आपटणे, हाताला धरून फरफटत नेणे, चिमटे काढणे आणि डोक्यावर मारणे असे विकृत प्रकार केला.
या घटना सीसीटीव्हीच्या व्हिडिओ फुटेज म्हणून उघडकीस आल्यानंतर कांदिवली पोलिसांनी दोन शिक्षिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना नोटीस बजावल्याचे वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
कांदिवली पश्चिमेला राहणाऱ्या एका पालकाने आपल्या 2 वर्षांचा मुलाला कांदिवली पश्चिमेच्या एमजी रोडवरील रायम्स अँड रंबल या प्ले ग्रुपमध्ये प्रवेश केला. जीनल छेडा, मेघना जोशी आणि विराज उपाध्याय यानीं मिळून सप्टेंबर 2022 मध्ये हा प्ले ग्रुप सुरू केला होता. जेथे आरोपी जिनल छेडा आणि तिची सहशिक्षिका भक्ती शहा काम करत होत्या.
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नमन सप्टेंबरपासून प्ले ग्रुपमध्ये जातो. मात्र काही दिवसांपासून तो फार चिडचिडा झाला होता आणि घरातील लोकांना मारण्यासाठी धावायचा. त्यामुळे तक्रारदार चिंतेत होते आणि त्यांनी ही काळजी अन्य पालकांकडे बोलून दाखवली. तेव्हा त्यांच्याही मुलांच्या स्वभावात असा फरक पडल्याचे त्यांनी तक्रारदाराला सांगितले. तेव्हा तक्रारदाराने प्ले ग्रुपचे संचालक जोशी आणि उपाध्याय यांना माहिती दिली. तेव्हा वर्गातील एखादा मुलगा चुकीची ॲक्टिव्हिटी करत असावा त्यामुळे मुले अशी वागतात, असे त्यांना सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज मधून बिंग फुटलं
वर्गातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तेव्हा शिक्षिकांचे कृत्य पाहून पालकांना धक्काच बसला. 1 जानेवारी, 2023 ते 27 मार्च 2023 या तीन महिन्यांच्या फुटेजमध्ये शिक्षिका जीनल आणि भक्ती या मुलांना मारहाण करत असताना दिसल्या. इतकेच नव्हे तर मुलांना त्या हाताला धरून फरफटत न्यायच्या, गालावर चिमटे काढायच्या, त्यांच्या डोक्यात पुस्तक मारायच्या. त्यांना उचलून बाजूला आपटायच्या. या प्ले ग्रुपमध्ये 28 मुलांनी प्रवेश घेतल्याचे पाेलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पाठविली आरोपींना नोटीस
कांदिवली पोलिस ठाण्यात दोन्ही शिक्षकांच्या विरोधात बाल न्याय अधिनियम 2000 चे कलम 23 अंतर्गत मुलांची काळजी आणि संरक्षण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याना कांदिवली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) दीपशिखा वारे यांनी सांगितले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…