वर्धा पोलिस अधिक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने आयपीएल क्रिकेट बुकीवर धाड टाकून कारवाई.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सध्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. त्यांवर अवैधरित्या सट्टा खेळल्या जात असल्याच्या पण माहिती समोर येत आहे. अशेच एक प्रकरण वर्धा पोलिस अधिक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने आयपीएल क्रिकेट बुकीवर छापा टाकून, मुख्य आरोपी सुनिल मधुकरराव सावरकर याला अटक करून समोर आणले आहे.

भारतात 30 मार्च पासून आयपीएल क्रिकेट लिग खेळवल्या जात आहेत. क्रिकेट मॅचवर लोक पैशाचे खेळ खेळतात. त्याचप्रमाणे सेलू तालुक्यातील टाकळी (झ) येथील सुनिल मधुकराव सावरकर (रा. टाकळी (झ) हा क्रिकेट मॅचवर सट्टा खेळत होता. त्यावरून पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी क्राईम इंटेलिजन्स
पथकास विशेष सूचना देवून, क्रिकेट बुकींवर धडक कारवाई करण्याचा आदेश दिला.

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार, ३ एप्रिल रोजी क्राईम इंटेलिजन्स पथकास गोपनिय माहिती मिळाली की, मौजा टाकळी (झ.) ता. सेलू, जि. वर्धा) येथील सुनिल सावरकर हा एनआयसीई या मॅच आयडीवरुन काही लोकांकडून क्रिकेटच्या मॅचवर हार-जीतचा खेळ खेळवत आहे. त्यावरुन संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतली असता, ही व्यक्ती त्याच्या घराच्या आजुबाजूच्या परिसरातून मॅचवर बेटींग करण्याचे काम करतो. याबाबतची सर्व माहिती मिळवून त्याच्यावर छापा कारवाई करून, त्याच्या मोबाईलची पडताळणी केली असता त्यामध्ये NICE 24 pro या आयडीमध्ये १५ लाख रुपये, TATA 999. fun या आयडी मध्ये ५० लाख रुपये, तसेच Dubai exchange .in या आयडीमध्ये १० लाख रुपये असे क्रेडीट असल्याचे दिसून आले. दरम्यान, आयडीमध्ये कोणकोण व किती क्लायंट आहेत, याबाबत संपूर्ण माहिती घेतली.

क्रिकेट मॅच दरम्यान ऑनलाईन पद्धतीने त्याचे एकूण १५ सहकाऱ्यांसह नावे पुढीलप्रमाणे : 1.कपूर कराटे (रा.सेलू), 2.अमोल उमाटे (रा. सेलू), 3. अनिल बिलदाने (रा.सेलू), 4. तुषार लोखंडे (रा.सेलू ) 5. घन:शाम संगताणी (रा.सेलू), 6. अवि डांगे (रा. सेलू), 7.शैलेश पेटकर (रा.सेलू) ,8.आसिक भाई (रा. पुलगाव), 9. मयूर येंडे (रा. पुलगाव), 10.निरज ढगे (रा. पुलगाव), 11. निलेश घवघवे (रा. केळझर ), 12. श्रेयश बाजायीत (रा.केळझर), 13.सूरज तेलरांधे (रा. केळझर), 14. गणेश दांडेकर (रा. केळझर, 15.संजय उमाटे (रा. घोराड) हे आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान ऑनलाईन क्रिकेट जुगाराचा हार-जीतचा खेळ चालवित असताना आढळून आले. यातील आरोपीतांचे कृत्य हे महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये होत असल्याने त्यांच्याविरुद्ध पोस्टे सेलू येथे मजुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हयातील आरोपींच्या ताब्यातून बेटींगसाठी वापरलेला वन प्लस ॲन्ड्रॉईड मोबाईल किंमत १५ हजार रूपये, रिअल-मी ॲन्ड्रॉईड मोबाईल किंमत ६ हजार रूपये, नगदी ९२,४०० रूपये असा एकूण जुमला किंमत १,१३,४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला.

पुढील कारवाई सेलू पोलिस स्टेशन करीत आहे. संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांच्या प्रत्यक्ष हजेरीत पोलिस अंमलदार रोशन निंबाळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे,धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, स्मिता महाजन,अंकीत जिभे, प्रफुल वानखेडे सर्व क्राईम इंटेलिजन्स पथक, वर्धा यांनी केली.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

9 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

9 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

9 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

9 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

9 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

10 hours ago