उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल येथील आदिवासी फासेपारधी समाजाच्या कुटुंबिय राहत असलेल्या वनविभागाच्या जागेवरील झोपड्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पूर्व सूचना न देता पोलिस बंदोबस्तात झोपड्या जीसीपी मशीन द्वारे जमिन दोस्त करून अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त केला आहे. यावेळी तिथे उपस्थित महिला आणि पुरुष यांना धक्काबुक्की करून एक प्रकारचा अमानवी अत्याचार केल्याचेही समोर आले होते.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल या गावी गेले ४० ते ५० वर्ष राहत असलेल्या आदिवासी फासेपारधी समाजाच्या कुटुंबीयावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी फासेपारधी समाजाला पूर्व सूचना न देता सूर्य उगवण्याच्या आत समाज झोपेत असताना त्यांची झोपड्या वजा घरे जीसीपी ने जमिनदोस्त करून त्यांच्या संसार उपयोगी वस्तूंची राखरांगोळी करुन एक प्रकारचा मानवी अत्याचार केला असून भारतीय ब्ल्यू पँथरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितिन गोंधळे, कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर ऑरगनायझेशन फाॅर राईट्स चे अध्यक्ष दिनेश पवार, सामाजिक कार्यकर्ते बबनजी गोरामन या नेत्यांच्या कडून वरील प्रकरणाची वृत्तपत्र बातम्या व व्हिडिओ सह सविस्तर माहिती केंद्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे सत्वर पाठवली. त्या प्रकरणाची गंभीर दखल आयोगाने सांगली जिल्हा पोलिस प्रमुख, वन संरक्षक संचालक, सांगली जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून झालेल्या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत प्राप्त न झालेस राज्यघटनेच्या कलम ३३८ (क) अन्वये कारवाई करणेची सूचना बजावली आहे. त्यामुळे भारतीय ब्ल्यू पँथर च्या कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…