वर्धा जिल्हातिल हमदापुर ठरले पोकरा योजनेतून महिला उद्योगांची यशस्वी यशोगाथा.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.5:- जेड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा ही योजना जिल्ह्यात महिलांसाठी वरदान ठरत आहे. सेलू तालुक्यातील हमदापुर हे गाव पोकरा योजनेचे सर्वात मोठे गाव ठरले आहे. या गावात सिध्दार्थ ग्रामसेवा संघ यागटाच्या महिलांनी योजनेच्या सहकार्याने शेंगदाना तेलासह विविध मसाल्यांचा उद्योग यशस्वीपणे सुरु केला आहे.

वर्धा जिल्हातील हमदापूर या गावात योजनेच्या सहकार्याने उमेदचे तब्बल 65 महिला बचतगट कार्यरत आहे. या गावातील महिला परंपरेने शेतमजुरी व आपल्या शेतात राबून उदरर्निवाह भागवित होत्या. पोकरा या योजनेत वैयक्तिक लाभासह सामुहिक लाभाच्या योजना असल्याने या योजनांबाबत महिलांना माहिती देण्यात आली. गृह उद्योगाबाबत महिलांना अवगत करण्यात आले. प्रक्रिया उद्योग कसे सुरु करावे, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आदींची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्यानंतर काही महिलांनी प्रभावित होऊन गृह उद्योग सुरु करण्याचा ध्यास घेतला.

गृह उद्योगासाठी महिलांना प्रकल्प अहवाल कसा तयार करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले आणि 7 लक्ष 10 हजार रुपये मुल्याचा प्रकल्प तयार करण्यात आला. सुरुवातीस महिलांनी पापड मशीन, कांडप मशीन, चक्की, हळद मशीन, ओला मसाला व ओली दाळ दळण मशीन घेऊन उद्योग सुरु करण्याचे ठरविले. यासाठी महिलांनी गटाची बैठक घेतली व उद्योगासाठी जागेचा प्रश्न सोडविला. कृषी विभागाच्यावतीने प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर महिलांनी स्वत: तत्कालीन औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर येथे जावून आवश्यक यंत्र व साहित्याची खरेदी केली.

यंत्र व साहित्याची शेड मध्ये उत्तम मांडणी करून उत्पादनास सुरुवात केली आहे. कागदपत्रांची पाहणी व पुर्व मोका तपासणी केल्यानंतर महिला गटाला या उद्योगासाठी 4 लक्ष रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. सद्या या गटाच्या वतीने पापड, विविध मसाल्यांचे कांडप, हळद, तिखट आदींचा प्रक्रिया उद्योग यशस्वीपणे चालविला जात आहे. नुकतेच शेंगदाना तेलाचा प्रक्रिया उद्योग देखील महिलांच्यावतीने यशस्वी पणे सुरु करण्यात आला आहे. या सर्व उत्पादनांचा चांगली मागणी असल्याने गटाला चांगले उत्पन्न मिळत आहे.

प्रकल्पाला थ्री-फेज वीज कनेक्शन देण्यात यावे
महिलांनी सुरु केलेल्या या उद्योगाला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यावेळी महिलांनी उद्योग नियमितपणे सुरु राहण्यासाठी वीज पुरवठ्याची अडचण असल्याचे सांगितले होते तसेच थ्री-फेज वीज कनेक्शन मिळावे, अशी विनंती केली होती. वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य करत या प्रकल्पास थ्री-फेज वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

8 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

8 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

11 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

11 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

15 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

15 hours ago